esakal | गुडघ्याला बाशिंग बांधून बसले अन् एका निर्णयाने स्वप्नच केले भंग
sakal

बोलून बातमी शोधा

gram-panchayat.jpg

-सत्ताधाऱ्यांचे ‘प्रशासकपदाचे’ स्वप्न भंग
- न्यायालयाच्या आदेशामुळे चपराक
- जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींवर नेमले जाणार प्रशासक
- न्यायालय आदेशामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांना संधी नाही

गुडघ्याला बाशिंग बांधून बसले अन् एका निर्णयाने स्वप्नच केले भंग

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक निवडणुका रद्द झाल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचे ग्रामपंचायतींवर प्रशासक होण्याचे स्वप्न तुर्तास तरी भंग झाले आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून यावर प्रशासक नेमण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आलेली असतानाच न्यायालयाच्या निकालामुळे प्रशासक होण्याच्या स्वप्नावर पाणी पडले आहे.
जुलै ते डिसेंबर या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक निवडणुका लांबविल्या असल्याने अशा ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या संमतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक नेमणूकीचे आदेश सरकारने दिले होते.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

 त्यानुसार जिल्ह्यातील सत्ताधारी विशेषत: राष्ट्रवादीचा वाटा अधिक असलेली यादीही तयार होऊन प्रशासनाच्या हाती सोपविण्यात आली होती. पालकमंत्र्यांकडून शिफारस होणाऱ्या यादीत नाव यावे यासाठी इच्छुकांनी स्थानिक सत्ताधारी नेत्यांचे उंबरठेही झिजविले आणि लॉबींगही केली. या निमित्ताने सत्ताधारी पक्षाला पुढच्याकाही काळासाठी ग्रामपंचायतींवर अप्रत्यक्ष सत्तेचा लाभ मिळणार होता. मात्र, प्रक्रीया अंतिम टप्प्यात आलेली असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने खासगी व्यक्तीच्या प्रशासक म्हणून नेमणूक करु नका, असा अंतरिम आदेश दिला आहे. त्यामुळे इच्छुक मंडळींचा स्वप्नभंग झाला आहे. यासाठी मारलेले खेटे आणि घेतलेले कष्टही पाण्यात गेले आहेत. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

प्रशासक नेमल्या जाणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

आष्टी : धनगरवाडी, कुंटेफळ, कारेगव्हाण, शेरी (बु.), डोईठण, कऱ्हेवाडी, वटाणवाडी, सुंबेवाडी, सोलापूरवाडी, हातोला, पिंपळा.

पाटोदा : काकडहिरा, उखंडा/पिट्टी, खडकवाडी, निरगुडी, दासखेड, पारगाव घुमरा, ढालेवाडी, अनपटवाडी, बेदरवाडी.

माजलगाव : दिंद्रूड, चोपानवाडी, नित्रुड, मोजगरा, गंगामसला,  

वडवणी : सोन्नाखोटा, देवळा.

परळी : रेवली, भोपला, लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर, वंजारवाडी.

धारुर : जहागीरमोहा, रुईधारुर, भोपा.

गेवराई : टाकळगाव, जवाहरवाडी, पांढरवाडी, तळेवाडी, तलवाडा, कुंभारवाडी, डोईफोडवाडी, चोपण्याचीवाडी, चव्हाणवाडी, मुळूकवाडी, वंजारवाडी, सुर्डी (बु.), गढी, गोविंदवाडी, मादळमोही, खेर्डावाडी, भडंगवाडी, खेर्डा (बु.), मन्यारवाडी, मानमोडी, बाबुलतारा.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
केज : वाघेबाभुळगाव, नारेवाडी, मुंडेवाडी, आंधळेवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, भोपला, घाटेवाडी, कोरडेवाडी, पैठण, रामेश्ववाडी, काशिदवाडी, बानेगाव, येवता, पाथ्रा, जाधवजवळा, मोटेगाव, लाखा, विडा/गौरवाडी, दरडवाडी, धोत्रा, शिंदी, बोबडेवाडी, सुकळी.

बीड : मौज/ब्रम्हगाव, मौजवाडी, वासनवाडी, जिरेवाडी, तिप्पटवाडी, कोळवाडी, पालवण, नागझरी, कडमवाडी, पिंपळगाव घाट, कर्झणी, पिंपळगाव मोची, नागापूर (बु.), कळसंबर, कारळवाडी, पिंपळगाव मजरा, पोखरी, काटेवाडी, गुंधा, बोलखंडी (पाटोदा), वरवटी, मानेवाडी, भंडारवाडी, बहीरवाडी, वंजारवाडी, आनंदवाडी, वायभटवाडी, गुंढेवाडी, म्हाळसापूर.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 
शिरुर कासार : हाटकरवाडी, रायमोहा, टाकळवाडी, भनकवाडी, सांगळवाडी, कोथंबरीरवाडी, कोळवाडी, येवलवाडी.

अंबाजोगाई : ढावडी, अंबलवाडी, हनुमंतवाडी, वाकडी, केंद्रेवाडी, दत्तपूर, मार्टी.

Edit By Pratap Awachar