esakal | बीड जिल्ह्यातील ह्र्दयद्रावक घटना : सासऱ्याने केला सुनेचा खून, पत्नीवरही कुऱ्हाडीने वार
sakal

बोलून बातमी शोधा

sheetal lavhare.jpg

बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव येथील घटना. 

बीड जिल्ह्यातील ह्र्दयद्रावक घटना : सासऱ्याने केला सुनेचा खून, पत्नीवरही कुऱ्हाडीने वार

sakal_logo
By
संंजय रानभरे

घाटनांदूर (बीड) : प्रेमविवाह केल्याने घराबाहेर काढलेला मुलगा आणि सुनेला पत्नीने घरात घेतले. त्यामुळे चिडलेल्या सासऱ्याने पत्‍नी आणि सुनेवर कुऱ्हाडीने वार केले. यात सुनेचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली. ही थरारक घटना पट्टीवडगाव (ता. अंबाजोगाई) येथे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शीतल अजय लव्हारे (वय २५) असे मृताचे तर बालासाहेब संभाजी लव्हारे असे संशयित सासऱ्याचे नाव आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

बालासाहेब याचा मुलगा अजयने काही वर्षांपूर्वी शीतलशी प्रेम विवाह केला. या दांपत्याला चार वर्षांची मुलगी आहे. अजय, शीतल आणि त्यांची मुलगी वेगळे राहत होते. दरम्यान, अजयच्या आईने त्यांना घरात घेतले. त्यामुळे याचा राग मनात धरून बालासाहेब याने सून शीतल आणि पत्नी सुवर्णा यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यात शीतलचा मृत्यू झाला तर सुवर्णा यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळास भेट दिली. पुढील तपास ते करीत होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)