बीड : नदीच्या पुरात एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून, मुलीचा मृतदेह मिळाला, बाप- लेकाचा शोध..

दत्ता देशमुख
Friday, 24 July 2020

कृष्णा बाळासाहेब घोरपडे (वय ३२ वर्षे), पथमेश कृष्णा घोरपडे (वय आठ) व वैष्णवी कृष्णा घोरपडे (वय सहा) (रा. बालमटाकळी, ता. ता. शेवगाव, जि. नगर) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

बीड : नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरुन घातलेली दुचाकी वाहून गेल्याने एका ३२ वर्षीय व्यक्तीसह त्याची दोन मुले वाहून गेल्याची घटना गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा पौळाचीवाडी (ता. गेवराई) येथे घडली. शुक्रवारी (ता. २४) यातील मुलीचा मृतदेह आढळून आला. बाप- लेकाचा उशिरापर्यंत शोध सुरु होता. कृष्णा बाळासाहेब घोरपडे (वय ३२ वर्षे), पथमेश कृष्णा घोरपडे (वय आठ) व वैष्णवी कृष्णा घोरपडे (वय सहा) (रा. बालमटाकळी, ता. ता. शेवगाव, जि. नगर) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

ग्रामस्थांसह बीडचे अग्नीशमन पथक उशिरापर्यंत शोध घेत हेाते. 
बालमटाकळी येथील कृष्णा घोरपडे यांची देवपिंप्री (ता. गेवराई) ही सासुरवाडी आहे. पंचमीच्या सणानिमित्त मुलांना मामाच्या गावी सोडविण्यासाठी ते गुरुवारी रात्री बालमटाकळी येथून दुचाकीवरुन मुलांसह देवपिंप्रीला निघाले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पौळाचीवाडी जवळ आल्यानंतर सर्वदुर पावसाने नदी दुथडी भरुन वाहत होती. यावेळी अमृता नदीला देखील पूर आला होता.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा घोरपडे यांनी पुलावरुन दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह तिघेही वाहून गेले.  शुक्रवारी सकाळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर अमृता नदीच्या अंधाऱ्यात वैष्णवीचा मृतदेह व त्यांची दुचाकी आढळून आली. मात्र नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कृष्णा व प्रथमेशचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. गेवराईचे महसूल पथक व बीडचे अग्निशमन पथक दुपारी घटनास्थळी दखल झाले. बोटीच्या सहाय्याने घोरपडे पिता पुत्रांचा शोध सुरु केला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नव्हता. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

म्हणून घटना लक्षात आली.
गुरुवारी रात्री कृष्णा घोरपडे व त्यांची दोन मुले मोटारसायकलसह वाहून गेले. रात्र असल्याने याची कोणालाच कल्पना नव्हती. दरम्यान, खळेगाव येथील युवकांची दुचाकी गुरुवारी याच पुलावरून वाहून गेली होती. शुक्रवारी ते दुचाकी शोधण्यासाठी आल्यानंतर त्यांना अन्य दुचाकी आढळली.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

ही दुचाकी कृष्णा घोरपडे यांची होती. त्यावरुन दुसरे कोणी वाहून गेल्याचा अंदाज आला. दरम्यान, कृष्णा घोरपडे यांनी रात्री नातेवाईकांना फोन करुन अमृता नदीच्या पुलाजवळ आल्याचे सांगीतले होते. खूप पाऊस पडतोय, असे म्हणून फोन ठेवला होता. त्यानंतर त्यांचा दुरध्वनी लागलाच नव्हता. 

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district three family member Carrying in river