esakal | बीड जिल्ह्यात दोन लाख लोकांना होऊन गेला कोरोना, तरीही पॉझिटिव्ह रेट कमी  
sakal

बोलून बातमी शोधा

e sakal corona.jpg

जिल्ह्यात हा सिरो सर्वे झाला तेव्हा जिल्ह्यात रुग्णसंख्या चार हजारांच्या पुढे होती. तेव्हा या सर्वेत ७.४ टक्के लोकांना कोरोनाची बाधा हेाऊन गेल्याचे समोर आले होते. म्हणजेच जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांच्या पुढे असल्याने त्यावेळी दोन लाखांवर लोकांना हा आजार होऊनही गेला होता असा अर्थ निघतो. आता जिल्ह्यात ११ हजारांच्या पुढे बाधितांचे संख्या आहे.

बीड जिल्ह्यात दोन लाख लोकांना होऊन गेला कोरोना, तरीही पॉझिटिव्ह रेट कमी  

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आणि देशात हल्लकल्लोळ माजला. लॉकडाउन, जमावबंदी अशा अनेक उपाय योजना हाती घेतल्या. पण, बीड जिल्ह्याने सुरवातीच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय-योजनांच्या अंमलबजावणीचा एक आदर्श पॅटर्न राज्यासमोर ठेवला. त्याचाच प्रत्यय आयसीएमआर (इंडियन काऊंसीन ऑफ मेडिकल रिसर्च) ने दोन वेळा केलेल्या सिरो सर्वेत आढळून आला. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्यात सर्वांत कमी पॉझिटिव्ह रेट बीड जिल्ह्यात आढळला. विशेष म्हणजे दोनदाही बीड राज्यात सर्वात मागे होते. कुठल्या ना कुठल्या बाबीने नेहमी चर्चेत आणि नाव खराब असलेल्या बीड जिल्ह्याचा कोरोनाशी लढण्याचा पॅटर्न मात्र राज्यासाठी दिशादर्शकच ठरला आहे. 


लॉकडाउनच्या सुरवातीला परतलेल्या स्थलांतरितांची अद्ययावत माहिती गोळा करणे, प्राथमिक तपासणी करणे, बाहेर फिरल्याचे गुन्हे, जमावबंदी, तंबाखूजन्य दुकानबंदी, नंतर सर्वच आस्थापने बंद, धार्मिक स्थळे बंद, अत्यावश्यक सेवांसाठी शिथिलतेच्या काळातील निर्बंध, जिल्ह्याच्या सरहद्दींवर तपासणी अशा अनेक उपाय-योजना राबविल्या गेल्या. यामुळे लोकांना त्रास झाला आणि काही प्रमाणात टीकाही झाली. पण, यामुळे अनेकांचे जीव वाचल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसेल. महसूल, आरोग्य, ग्रामीण आरोग्य, ग्रामविकास अशा सर्वच यंत्रणांनी या प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीत झोकून देऊन काम केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विशेष म्हणजे या उपाय योजनांना जिल्हावासियांनी प्रतिसादही उत्तम दिला. याचे परिणाम सुरवातीला दिसून आलेच. तीन महिने जिल्हा कायम कोरोना शून्य राहिला. त्या काळात आरोग्य विभागाला उपचारासाठीची यंत्रणा उभी करायलाही वेळ मिळाला. त्याचेच परिणाम आता पुन्हा एकदा दिसून आले आहेत. सिरो सर्वेत राज्यात सर्वात कमी पॉझिटिव्ह रेट बीड जिल्ह्यात आढळला आहे. या कामात सहाजिकच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, तत्कालीन एसपी हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्यासह यंत्रणेला आणि जिल्हावासियांच्या संयम आणि प्रतिसादाला श्रेय जाते. 
 देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसऱ्यांदा राज्यात सर्वांत कमी बीड 
आयसीएमआर (इंडियन काउन्सील ऑफ मेडिकल रिसर्च) या देशातील सर्वोच्च आरोग्य संस्थेने राज्यातील सहा जिल्ह्यांत दोनदा सिरो सर्व्हे केले. यामध्ये दोनदाही बीडचा पॉझिटिव्ह रेट सर्वांत कमी आढळला आहे. ३० ऑगस्टला केलेल्या सर्वेत बीड जिल्ह्यात पॉझिटिव्हचे शेकडा प्रमाण ७.४ आढळले आहे. सर्वाधिक २५.९ टक्के प्रमाण जळगाव जिल्ह्यात आढळले. यापूर्वीच्या पहिल्या सर्वेत बीडचे हेच प्रमाण एक टक्का होते. विशेष म्हणजे मराठवाड्यातील परभणी व नांदेड जिल्ह्याचे प्रमाण बीडच्या अधिक असून परभणीचे प्रमाण तर बीडपेक्षा दुपटीहूनही अधिक आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन लाखांवर लोकांना होऊन गेला होता 
ज्यावेळी जिल्ह्यात हा सिरो सर्वे झाला तेव्हा जिल्ह्यात रुग्णसंख्या चार हजारांच्या पुढे होती. तेव्हा या सर्वेत ७.४ टक्के लोकांना कोरोनाची बाधा हेाऊन गेल्याचे समोर आले होते. म्हणजेच जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांच्या पुढे असल्याने त्यावेळी दोन लाखांवर लोकांना हा आजार होऊनही गेला होता असा अर्थ निघतो. आता जिल्ह्यात ११ हजारांच्या पुढे बाधितांचे संख्या आहे. 
(Edited By Pratap Awachar)