esakal | बीड : बदल्यांच्या नावाखाली आरोग्य विभागात 'सोयी' चा खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

बदली.jpg

-बदली चक्क अर्धा किलोमिटर अंतरावर
-वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांत प्रकार
-कोरोनातही आरोग्य विभागात चाललेय काय
-पदोन्नत्यांच्या फाईल पुढे सरकेना
-पाच-दहा वर्षांपासून ठाण मांडलेले जागेवरच

बीड : बदल्यांच्या नावाखाली आरोग्य विभागात 'सोयी' चा खेळ

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : या महिन्यात सध्या सर्वच शासकीय विभागांत प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रीया सुरु आहे. आरोग्य विभागानेही ७० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (गट-अ) प्रशासकीय बदल्यांचे आदेश काढले आहेत. मात्र, बदल्यांच्या यादीवर नजर टाकली असता हा भातुकलीचा खेळ तर नव्हे असेच वाटत आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

अगदी प्रशासकीय नावाखाली अर्धा किलोमिटर अंतरावरील दुसऱ्या आरोग्य संस्थेत बदली करुन आरोग्य विभागाने अशा कोरोनाच्या काळातही नेमके साधलेय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे मागच्या पाच-दहा वर्षांपासून एकाच जागी (सोयीच्या) ठाण मांडलेले अधिकारी आजही आहे तिथेच आहेत. तसेच, पदोन्नतीची प्रक्रीयाही रखडल्याने अनेक पदे प्रभारींच्या खांद्यावर आहेत.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

कोरोनातही प्रभारी राज सुरु असताना आरोग्य विभाग यासाठी तातडी दाखविण्याऐवजी काही लोकांची सोय करुन आरोग्य विभागातील बदली करणाऱ्या विभागाने नेमके साध्य काय केले असा प्रश्न आहे. आता ही या मंडळींची सोयच असताना त्याला प्रशासकीय नाव दिल्याने प्रवासखर्च (सामान इकडून तिकडे नेण्यासाठी देय असलेला) देखील द्यावा लागणार आहे. म्हणजेच त्याचा भुर्दंड शासन तिजोरीवर पडणार आहे. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

ता. १० ऑगस्ट रेाजी अवर सचिव स. ह. भोसले यांच्या स्वाक्षरीने सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील ७० अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश निघाले आहेत. यादीतील दुसरीच बदली सांगली जिल्ह्यातून याच जिल्ह्यात झाली आहे. उजनी (ता. अंबाजोगाई) आरोग्य केंद्रातून याच तालुक्यातील लोखंडीच्या वृद्धत्व आरोग्य व मानसिक आरोग्य केंद्रात झाली आहे. दोन्हींतील अंतर फार तर १५ किलोमिटर आहे. 

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

बीडच्या जिल्हा क्षयरोग केंद्रातून सहाय्यक संचालक कुष्ठरोग केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाली आहे. येथेच दुसरी बदली सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय बीड येथून जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयात झाली आहे. दोन्हींतील अंतर अर्धा किलोमिटर आहे. म्हणजे दोघांच्याही सोयीची किती काळजी या प्रशासकीय नावाखाली घेतली हे दिसते. 

एक बदली घाटनांदूरहून धर्मापूरीत झाली आहे. दोन्हींत पाच सात किलोमिटरचे अंतर असेल. तर कोणाची औंध (पुणे) रुग्णालयातून येथीलच दुसऱ्या रुग्णालयात बदली केली आहे. अख्ख्या यादीवर नजर टाकल्यानंतर या प्रशासकीय बदल्या कशा म्हणाव्यात असाच प्रश्न पडतो. वास्तविक प्रशासकीय बदल्या या सिनीॲरीटीनुसार होतात. तर, विनंती बदल्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन पर्याय मागविले खरे त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. 

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड  

पदोन्नत्या कधी; प्रभारी राज
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधीक्षक पदावर पदोन्नत्याची प्रक्रीया होऊन फाईलही तयार झाली आहे. त्याला मात्र हात लावायला राज्यकर्ते आणि आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांना वेळ दिसेना गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधीक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रभारीराज सुरु आहे. तसेच, जिल्हा रुग्णालयातील वर्ग एक अधिकाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत. पदोन्नत्यांमधून जागा भरल्या जाण्याची आशा आहे. मात्र, नेमकी हीच फाईल धुळखात पडली आहे.

संपादन-प्रताप अवचार