Beed: बनावट ग्रीस असलेल्या घरावर छापा टाकून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

Latest Marathwada News: पोलिसांनी रियाज रहीम शेख यास अटक केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (ता.३०) आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed: बनावट ग्रीस असलेल्या घरावर छापा टाकून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
Updated on

Latest Beed News: येथे दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या ग्रीस, ऑइलचे बनावट उत्पादन करणाऱ्या शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील एका घरात सुरू असलेल्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या बीड आणि शहर पोलिसांनी छापा टाकून ७ लाख ८२ हजार ८५ रुपये किमतीचे बनावट ग्रीस, ऑइल, कच्चा माल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी रियाज रहीम शेख ( रा. बसवेश्वर कॉलनी) यास अटक केली आहे.

Beed: बनावट ग्रीस असलेल्या घरावर छापा टाकून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
Beed News : चुकीला माफी नाहीच; चौकशी करू - अजित पवार

शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील एका घरात वाहनांसाठी लागणाऱ्या ग्रीस, ऑइलचे बनावटरीत्या उत्पादन करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हा शाखा बीड येथील पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पोलीस जमादार विष्णू सानप आणि शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गट्टूवार, पोलीस जमादार गित्ते, श्री येलमटे व गोविंद भताने यांच्या पथकाने बसवेश्वर कॉलनी येथील कारखान्यावर बुधवारी (ता.२८) सायंकाळी साडेपाच वाजता धाड टाकली.

Beed: बनावट ग्रीस असलेल्या घरावर छापा टाकून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
Beed: टेम्पो मालकाने केली मारहाण, जाचास कंटाळून चालकाने संपवले जीवन!

यावेळी येथे बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन होत असल्याचे आढळून आले. त्यासाठी वापरण्यात येत असलेले केमिकल, बनावट ग्रीस, ऑइलचा मोठा साठा पोलिसानी जप्त केला. तसेच पोलिसांनी रियाज रहीम शेख यास अटक केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (ता.३०) आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed: बनावट ग्रीस असलेल्या घरावर छापा टाकून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
Beed : व्हॉटस्अ‍ॅपला स्टेटस ठेवून तरुणाने संपवले जीवन; कुटुंबियांना बसला धक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com