Video : आमदारांनी धरला पत्नीसोबत फुगडीचा फेर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

जिजाऊ जयंतीनिमित्त मांजरसुंबा येथील उड्डाणपुलाचे "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब उड्डाणपूल - मार्ग' असे नामकरण करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत हे बॅनर पुलाला लावले.

बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. यात आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील सहभागी होत्या.

"तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ-जय शिवराय', "जय भवानी, जय शिवाजी', "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब की जय' अशा घोषणांच्या निनादाने रविवारी (ता. 12) बीड दणाणून गेले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मिरवणुकीला मोठी गर्दी जमली.

सकाळी उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादनासाठी बीडकरांनी एकच गर्दी केली होती. जिजाऊ वंदनेनंतर घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींसह महिलांचाही मोठा सहभाग होता. जयंतीनिमित्त मॉं जिजाऊ यांचा पुतळा फुलांनी सजवून शहरभर कमानी उभारण्यात आल्या होत्या. 

दुपारी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधव भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले. यासह घोड्यांवरील बाल शिवाजी, जिजाऊंच्या वेशभूषेतील मुलींनी लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत लेझीम, ढोल पथकांनी लक्ष वेधून घेतले. शहरभर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. 

ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सायंकाळी फुगड्यांचे फेर रंगले. यावेळी उपस्थितांनी क्षीरसागर दाम्पत्यालाही फुगडी खेळण्याचा आग्रह केला आणि मग आमदार संदीप क्षीरसागर आणि नेहा क्षीरसागर यांची फुगडी रंगली अन् उपस्थितांनीही त्यांना दाद दिली.

उड्डाणपुलाचे नामकरण 

जिजाऊ जयंतीनिमित्त मांजरसुंबा येथील उड्डाणपुलाचे "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब उड्डाणपूल - मार्ग' असे नामकरण करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत हे बॅनर पुलाला लावले.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed MLA Sandip Kshirsagar Rajmata Jijau Jayanti News