आई-वडिलांकडे झोपायला जाताना तिला वाटलंही नसेल...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

घर बंद करून आई-वडिलांकडे झोपण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील दागिने व रक्कम असा तब्बल सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास केला.​

अंबाजोगाई : घर बंद करून आई-वडिलांकडे झोपण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील दागिने व रक्कम असा तब्बल सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी (ता.15) पहाटेच्या सुमारास घडली. बर्दापुर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सायगाव येथे राहणार्‍या सय्यद आयशा अकबर पाशा या 14 जानेवारी रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आई-वडिलांकडे मुक्कामी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी घराचे कुलुप बंद केले होते. दरम्यान पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास सय्यद अयशा यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. 

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

कपाटातील नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिणे असा तब्बल 2 लाख 25 हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सय्यद आयशा यांनी बर्दापुर ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तपासाचे आव्हान

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. पेठ बीड ठाण्यासह पाटोदा तालुक्यातील बोडखेवाडी याठिकाणी नुकत्याच घरफोडीच्या दोन घटना घडल्या.

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  

याचा तपास लागलेला नसतांनाच आता बुधवारी अंबाजोगाई तालुक्यातील सायगावमध्ये अशीच घटना घडल्याने यामागे एखादी टोळी सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त केला असून पोलिसांना या गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान निर्माण झाला आहे.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Police Crime Theft News Marathwada News