esakal | साडेतीनशेवर गुन्ह्यांचा तपास लावणारा 'रॉकी' आता....
sakal

बोलून बातमी शोधा

beed dog.jpg
  • अनेक पदकांचा मानकरी, साडेतीनशेवर गुन्ह्यांचा लावला होता तपास. 
  • त्याला निरोप देताना अधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पानावल्या. 

साडेतीनशेवर गुन्ह्यांचा तपास लावणारा 'रॉकी' आता....

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पदकांचा मानकरी आणि खुन, चोऱ्या, दरोडे अशा साडेतीनशेवर गंभीर गुन्ह्यांचा तपास त्याने केला. पण, आजाराने निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी खांदा दिला आणि त्याला अखेरचा निरोप देताना भावूक झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पानावल्या.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

नऊ वर्षांच आयुष्य जगलेल्याला निरोप देताना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलातर्फे मानवंदनाही देण्यात आली. त्याचं जाणं पोलिस दलासाठी जेवढ वेदनादायी तेवढं त्याच्यासाठी अभिमानाच ठरलं. ज्याच्यासाठी हवेत बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली गेली हा नशिबवान आहे पोलिस दलातील श्वान रॉकी. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

१८ ऑक्टोबर २०११ ला जन्म झालेला रॉकी वयाच्या सहाव्या महिन्यात बीड पोलिस दलात दाखल झाला. नऊ महिने त्याने विविध प्रशिक्षणे घेतल्यानंतर त्याची गुन्हे तपासासाठी निवड झाली. नितीन येवले व सुरेंद्र दुबाले यांच्या सोबतीने त्याने २०१३ ते १५ या तीन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील एआयपीडीएम स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधीत्व केले. २०१६ साली म्हैसूर (कर्नाटक) येथील याच स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावत पोलिस दलाची मान उंचावली. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यांतील ३६५ गुन्ह्यांचा तपास आणि शिरटोन (जि. उस्मानाबाद) येथील खुनाच्या तपासातही त्याच्यामुळे यश आले. कोरोना जनजागृती बाबत पोलिस दलाने बनविलेल्या शॉर्ट फिल्ममध्येही रॉकीची भुमिका आहे. दरम्यान, ता. १७ जूलै पासून आजारी असलेल्या रॉकीचे शनिवारी पहाटे निधन झाले.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

त्याच्या अंत्यविधीला अख्खे पोलिस दलातील प्रमुख हजर होते. रॉकीची सजविलेल्या पोलिस जीपमधून अंत्ययात्रा निघाली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपाधीक्षक भास्कर सावंत, स्वप्नील राठोड आदी बड्या अधिकाऱ्यांनी त्याच्या प्रेतयात्रेला दोरीच्या सहाय्याने खांदा दिला. त्यानंतर त्याला बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. 

Edited By Pratap Awachar