

Gun Firing
बीड - बीड शहरालगत असलेल्या इमामपूर रस्ता परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ जुन्या वादाच्या कारणावरून थरारक गोळीबाराची घटना घडली आहे. तू आमच्याकडे काय बघतोस? असा जाब विचारत झालेल्या बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून तीन राऊंड फायर करण्यात आले. या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी एका आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.