प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कळमनुरी आगाराच्या कर्मचाऱ्यांचे भीख मागो आंदोलन | Hingoli News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kalmanuri bus depo

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कळमनुरी आगाराच्या कर्मचाऱ्यांचे भीख मागो आंदोलन

कळमनुरी : मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या कळमनुरी आगाराच्या(st strike) कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली जात नाही या निषेधार्थ आंदोलना मध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवार ता. २६ ला भीक मांगो आंदोलन करून शासन व नागरिकांचे लक्ष वेधले.

हेही वाचा: दादा कुठं मधेच घुसले? संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचे(msrtc ) शासनामध्ये विलगीकरण करावे या मागणीकरिता मागील अडीच महिन्या पेक्षा अधिक कालावधीपासून कर्मचारी काम बंद आंदोलनात उतरले आहेत कळमनुरी आगाराचे जवळपास ११४ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झालेले आहे या कर्मचाऱ्यां मध्ये आगारातील सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी असल्यामुळे आगाराचे कामकाज ठप्प झालेले आहे या काळात आगाराचे मोठे उत्पन्न बुडाले असून काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनाही मागील अडीच महिन्या पासून वेतन मिळालेले नाही त्यामुळे हे कर्मचारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेले आहे.

हेही वाचा: संजय राऊत हे जगभरातील १८२ देशांचे प्रमुख; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होऊन मोठा कालावधी उलटल्यानंतरही शासनाकडून या आंदोलनाचे म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही असा आरोप आता आंदोलनात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी चालविला आहे शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ कळमनुरी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी बुधवार ला बस स्थानक परिसरात भीक मागो आंदोलन केले कळमनुरी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत असतानाच आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांची ही लक्ष वेधल्या गेले.

हेही वाचा: देशात कोरोनाचं विक्राळ रुप ते संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला; वाचा एका क्लिकवर

कळमनुरी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनामध्ये विजय राऊत, सोमेश व्यवहारे, शिवाजी फोले, साहेबराव खुडे, गणेश भगत, विलास चेन्ने, विजय फोपसे ,अब्दुल कलीम, दीपक पंचलिंगे ,नितीन पाईकराव भास्कर बलखंडे, कलीम शेख, संतोष भिसे, ज्ञानेश्वर खोकले, श्रीधर पुलाते, किरण भुरके, पंडित शेळके, राजीव डुकरे, यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते कर्मचाऱ्यांनी बस स्थानक परिसरात हे आंदोलन करून कर्मचाऱ्यां समोर असलेल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला.एकंदरीत कळमनुरी आगाराच्या(kalmanuri st depo ) कर्मचाऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आपल्या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली जात नाही हे पाहून कर्मचाऱ्यांनी सामूहिक रित्या केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Begging Agitation Of Kalamanuri Depot Employees On Republic Day In Hingoli Marathwada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..