प्रथमच भाविकाविना साजरा झाला तुळजाभवानी मातेचा भेंडोळी उत्सव

जगदीश कुलकर्णी 
Saturday, 14 November 2020

तुळजाभवानी मातेचा भेंडोळी उत्सव शनिवारी (ता.१४) रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास या उत्सवास प्रारंभ झाला. तत्पूर्वी महंत मावजीनाथ बुवा यांचे तुळजा भवानी मंदिरात परंपरेने आगमन झाले. काळभैरव मंदिरासमोरून पारंपरिक पारापासून भेंडोळी उत्सवास प्रारंभ झाला. 

तुळजापूर : तुळजाभवानी मातेचा भेंडोळी उत्सव शनिवारी (ता.१४) रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास या उत्सवास प्रारंभ झाला. तत्पूर्वी महंत मावजीनाथ बुवा यांचे तुळजा भवानी मंदिरात परंपरेने आगमन झाले. काळभैरव मंदिरासमोरून पारंपरिक पारापासून भेंडोळी उत्सवास प्रारंभ झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुळजाभवानी देवस्थान समितीच्या वतीने सवाद्य मिरवणुकीने जाऊन भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा मार्गे भेंडोळी तुळजा भवानी मातेच्या गाभाऱ्यात आली. तुळजा भवानी मातेच्या गाभाऱ्यात भेंडोळीवर गोडेतेल अर्पण करण्यात आले. गणेश विहार, लक्ष्मी नरसिंह मंदिर तसेच तुळजा भवानी मातेचे होमकुंड यासह विविध ठिकाणी भेंडोळीने प्रदक्षिणा घेतली. भेंडोळी उत्सवाची कमानवेस भागात सांगता झाली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुळजा भवानी मंदिर समितीतर्फे महंत मावजीनाथ बुवा यांना रात्री भरपेहराव आहेर करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले उपस्थित होते. महंत मावजीनाथ बुवा यांच्या वतीने तुळजा भवानी मातेची पुजा परंपरेने करण्यात आली. तुळजा भवानी मातेचे अभ्यंगस्नान शनिवारी (ता. १४) पहाटे पार पडले. तुळजा भवानी मातेच्या मंदिरात भेंडोळी उत्सवाच्या वेळी महंत मावजीनाथ बुवा आणि अन्य महंत उपस्थित होते. कमानवेसमध्ये भेंडोळीची पूजा क्षीरसागर घराण्याचे बाबा क्षीरसागर, आनंद क्षीरसागर, बुबासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते पूजा आणि आरती होऊन मानाच्या चार घागरी भेंडोळीवर अर्पण करण्यात आल्या. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhendoli celebration of Tulja Bhavani mother