corona Breaking : लातूरातील माजी आमदाराची पत्नी निघाली कोरोना पॉझिटिव्ह

हरी तुगावकर
Tuesday, 14 July 2020

भारतीय जनता पक्षाचे एका माजी आमदाराची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या माजी आमदाराचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

लातूर : येथील भारतीय जनता पक्षाचे एका माजी आमदाराची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या माजी आमदाराचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. घरातील इतर सदस्यांची आता तपासणी केली जाणार आहे. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱयाची आई देखील पॉझिटीव्ह आल्याने महापालिका देखील हादरली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दररोज वीस ते पंचविस रुग्ण पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. लोकात तसेच शेतकऱयात या माजी आमदारांचा मोठा संपर्क आहे. सातत्याने ते फिरत असतात. काल त्यांच्या पत्नीला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

त्यांच्यासोबत या माजी आमदारांचे देखील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले होते. माजी आमदारांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर त्यांच्या पत्नीचा अहवाल  मात्र पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅबचे नमुनेही तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.
दरम्यान रविवारी (ता. १२) येथील महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱय़ांची आईचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा विभाग रात्रंदिवस काम करीत आहे. हा अधिकारी देखील सातत्याने शहरात फिरून काम करीत आहे. त्यांची आई पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

(संपादन : प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP ex mla wife report is corona positive