भाजपा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटूंबातील सहाजण कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधीत झाले आहेत. काही दिवसापूर्वी आमदार ठाकूर यांच्या आई आजारी असल्याने मंगळवारी (ता.४) कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती.

परंडा (जि.उस्मानाबाद): भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधीत झाले आहेत. काही दिवसापूर्वी आमदार ठाकूर यांच्या आई आजारी असल्याने मंगळवारी (ता.४) कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती.

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

ठाकूर यांच्या कुटूंबातील सहा सदस्य कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. रविवारी (ता.९) पून्हा सदस्य व संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआर करण्यात आले. दरम्यान कुटूंबातील आणखी तीन तर संपर्कातील तीन जण बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

अजूनही तीन जणांचे अहवाल येण्याचे बाकी असून आमदार ठाकूर यांच्यासह सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती ठाकूर यांनी सोशल मिडीयाद्वारे प्रसारित केली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोना तपासणी करुन घ्यावी असेही ठाकूर यांनी आवाहन केले आहे. 

मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. काळजीपोटी अनेकांचे फोन येतात, मात्र सर्वांना उत्तर देणं शक्य नाही. मोबाईल संदेशाद्वारे कामासाठी उपलब्ध असेन. 

-सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस, भाजपा.

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Sujitsingh Thakur Detect CoronaPositive Osamanabad News