esakal | कृषी बिल विरोधी अध्यादेशाची भाजपने केली होळी.
sakal

बोलून बातमी शोधा

krushi bill ०७.jpg

महाराष्ट्र राज्याच्या आघाडी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा बुधवारी (ता.७) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर भाजपाच्या वतीने निषेध करून अध्यादेशाची होळी करण्यात आली.

कृषी बिल विरोधी अध्यादेशाची भाजपने केली होळी.

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या आघाडी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा बुधवारी (ता.७) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर भाजपाच्या वतीने निषेध करून अध्यादेशाची होळी करण्यात आली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

केंद्र शासनाने संमत केलेले कृषी बिल विधेयक शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर आहे. यासंदर्भात भाजपाच्या नेत्यांनी बाजार समितीत सोमवारी आयोजित आंदोलनात माहिती दिली. महाराष्ट्रातील आघाडी सरकार शेतकरी विरोधी कशा पद्धतीने भूमिका घेत आहे. यावर अनेकांची भाषणे झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, भाजपाचे प्रदेश चिटणीस नागनाथ निडवदे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी सभापती बापूराव राठोड, उपाध्यक्ष सुधीर भोसले, भगवान पाटील तळेगावकर, नगरसेवक नागेश अष्टुरे, मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, ॲड. दत्ताजी पाटील, महिला आघाडीच्या उत्तरा कलबुर्गे, गणेश गायकवाड, बापूराव येलमटे, पप्पू गायकवाड,आनंद बुंदे, साईनाथ चिमेगावे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मजगे, बस्वराज रोडगे, उदयसिंह ठाकुर, पंडीत सुर्यवंशी, श्याम मालानी, अनिता नेमताबादे, माजी उपसभापती रामदास बेंबडे, पंचायत समिती सदस्य सुभाष कांबळे, शामल कारामुगे, मधुमती कनशेट्टे, संजय पाटील, आनंद साबणे, अमोल निडवदे, संतोष बडगे, रवींद्र बेद्रे, देवीलाल कांबळे, व्यंकट काकरे, सुरज हंद्रगुळे, आदींसह पक्ष पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)