कौटुंबिक वादात पडला म्हणून तरुणाचा निर्घृण खून! 

दत्ता देशमुख
Friday, 6 November 2020

अपहरण करुन शरीरावर केले तीक्ष्ण हत्याराने वार. बीड जिल्ह्यातील पिंप्री फाटा येथील घक्कादायक घटना.  

बीड : तरुणाचे अपहरण करुन शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) तालुक्यातील पिंप्री फाटा येथे घडली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राजेभाऊ अशोक खराडे (वय २३, रा. नागपूर बु., ता. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महारुद्र मच्छींद्र परसकर (रा. उमरद खालसा) याच्या विरोधात पिंपळनेर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. बी. भुतेकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजेभाऊ अशोक खराडे याची मावसबहीण ही संशयित आरोपी महारुद्र परसकर याची भावजय आहे. त्याचा भाऊ आणि भावजयीमध्ये असलेल्या कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी राजेभाऊ यांनी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर काही दिवसातच राजेभाऊ याचे अपहरण झाले. त्यासंबंधी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. अपहरण झालेल्या राजेंभाऊ शोध सुरु असतानाच शुक्रवारी (ता.06) सकाळी पिंप्री फाटा येथील एका रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. त्याच्या पोटावर, हातावर आणि पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आलेला होता. मृताच्या आईच्या फिर्यादीवरून महारुद्र मच्छिंद्र परसकर (रा. उमरद खालसा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक श्री. सानप करत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भांडण सोडविण्यासाठी गेला म्हणून झाला घात
मृत राजेभाऊ अशोक खराडे यांच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी महारुद्र मच्छिंद्र परसकर यांच्या कौटुंबिक भांडणे सोडविण्यासाठी माझ्या मुलाने मदत केली. मात्र, आरोपी परसकर याने तो राग मनात धरुन माझ्या मुलाचा निर्घूण खून केला आहे. त्याचे अपहरण करुन खून केला आहे. आले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brutal murder of youth Beed district crime news