शासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन, कृषी विभागात नियुक्तीची मागणी

शासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन, कृषी विभागात नियुक्तीची मागणी

लातूर : कृषी विभागाच्या वतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली. निकाल जाहीर केला. अंतिम निवड यादी लावली. या सर्व प्रक्रियेला आता दोन वर्ष पूर्ण होत असले तरी नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पात्र उमेदवारांत असंतोष पसरला आहे. यातून त्यांनी येथील कृषी सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. यात मंगळवारी (ता. तीन) या उमेदवारांनी शासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन केले. लातूर विभागातील कृषी सेवक भरती प्रक्रिया २०१९ मध्ये राबवण्यात आली. १६९ कृषी सहायक पदाकरिता परीक्षा घेण्यात आल्या. निवड यादीही लावण्यात आली. काही जणांना नियुक्त्याही देण्यात आल्या.

शासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन, कृषी विभागात नियुक्तीची मागणी
Nanded : नांदेडमधील दुकानातून ३१ तलवारी, १६ खंजीर जप्त

पण, ९१ जणांना अद्याप नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही या पात्र उमेदवारांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा काळ सुरू आहे. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने या उमेदवारांनी सोमवारपासून येथील कृषी सहसंचालक कार्यालयासमोर कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले आहे. यात मंगळवारी शासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने व संबंधित कृषी सहसंचालकांनी तातडीने नियुक्त्या दिल्या नाहीत तर राज्यभर उपोषण करण्याचा इशाराही या संघटनेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com