कारमालकाला झाडाला बांधून लुटले, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार

सयाजी शेळके  
Wednesday, 30 September 2020

बंदुकीचा धाक दाखविण्यात आला. ‘‘आवाज करू नको, नाहीतर गोळी घालेन, तुझ्याजवळचे सर्व पैसे आमच्याकडे दे,’’ असे धमकावले. यावेळी लुटारूंनी त्यांच्याजवळील दोन मोबाइल व आठ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून आणल्यानंतर नळदूर्ग रोडवरील चिंचेच्या झाडाला बांधले.

उस्मानाबाद : तुळजापूर-औसा महामार्गावर कारमालकाला झाडाला बांधून गोळ्या घालण्याची धमकी देत लुटल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. त्यानंतर कार पळवून नेण्यात आली. हा प्रकार बुधवारी (ता. तीस) पहाटे अडीच्या सुमारास घडला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लक्ष्मण सोनकांबळे (रा. वाकडी, जि. रायगड) असे कारचालकाचे नाव असून, त्यांच्याजवळील मोबाइल आणि रोकडही लुटारूंनी लंपास केली. लक्ष्मण सोनकांबळे पहाटेच्या सुमारास त्यांच्या हुंदाई कारमधून (एमएच ०४, एफएफ ५९१) औशावरून तुळजापूरच्या दिशेने जात होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टोलनाक्यापासून वीस किलोमीटरवर आले असता, पाच दरोडेखोरांनी त्यांना कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखविण्यात आला. ‘‘आवाज करू नको, नाहीतर गोळी घालेन, तुझ्याजवळचे सर्व पैसे आमच्याकडे दे,’’ असे धमकावले. यावेळी लुटारूंनी त्यांच्याजवळील दोन मोबाइल व आठ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून आणल्यानंतर नळदूर्ग रोडवरील चिंचेच्या झाडाला बांधले. त्यानंतर हुंदाई कार घेऊन दरोडेखोर पसार झाले. या प्रकरणी सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car owner was tied to a tree and robbed