बापरे! सोनसाखळी चोराकडे इतका मुद्देमाल सापडला की... 

युवराज धोतरे 
Saturday, 25 January 2020

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसापासून पहाटेच्या वेळी व दिवसा महिलांच्या गळ्यातील गंठण व सोन्याचे दागिने जबरीने हिसकावणे, चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.

उदगीर (जि. लातूर) : ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यास  हातापायी करून पळून गेलेल्या सोनसाखळी चोराला शुक्रवारी (ता.24) पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. या आरोपीने १३ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, पाच लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती  ग्रामीण पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी दिली आहे.

वाचा - वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसापासून पहाटेच्या वेळी व दिवसा महिलांच्या गळ्यातील गंठण व सोन्याचे दागिने जबरीने हिसकावणे, चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पोलीस उपाधीक्षक मधुकर जवळकर, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री शिरसाठ, स्थानिक गुन्हा  शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ग्रामीण पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी ओमप्रकाश याळे रा.पंढरपुर (ता.देवणी) हा नळेगावहुन उदगीरकडे ऑटोरिक्षाने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता  

या वर्णनावरून येत असलेला काळ्या रंगाचा रिक्षा थांबवुन या आरोपीला पकडण्यात आले. पोलीस ठाण्यात नेऊन याची अधिक चौकशी केली असता त्याने उदगीर शहरात सोनसाखळी व गंठण चोरीच्या आतापर्यंत 13 गुन्ह्याची कबुली दिली त्यापैकी नऊ गुन्ह्यातील 160 ग्रॅम म्हणजे सोळा तोळे सोने त्याची अंदाजे किंमत पाच लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

क्लिक करा - घाटीत पुन्हा तोडफोड, डॉक्टरला...  

यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश गायके, बालाजी पलेवाड, नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, कैलास चौधरी, सुनील घोडके, नाना शिंदे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, कृष्णा पवार, वेंकट नळगीरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील रेजीतवाड, अंगद कोतवाल, राम गवारे, युसुफ शेख, सदानंद योगी, राजाभाऊ मस्के, नागनाथ जांभळे, राजेश कंचे आदींनी पुढाकार घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chain Snatcher Arrested In Udgir Latur News