बदल फक्त कागदावर रहायला नकोत : डॉ. विजय पांढरीपांडे

dr pandhripande.jpg
dr pandhripande.jpg

औरंगाबाद : नव्या शैक्षणिक धोरणात बालवाडीपासुन ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत केलेले बदल स्वागतार्ह असेच आहेत. मात्र, हे बदल कागदावरच रहायला नकोत, अशी भीती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. 

डॉ. पांढरीपांडे म्हणाले, केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण स्विकारले आहे. दीड वर्षापासुन त्यावर काम सुरु होते. नव्या धोरणात शिक्षणाच्या उपयोजिकतेवर तसेच अध्यापनाऐवजी अध्ययनावर भर राहणार आहे. परीक्षेला, गुणांना दिलेले अवास्तव महत्व कमी होणार आहे. स्कील, लर्निंगवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शालेय शिक्षणात मातृभाषेवर महत्व दिले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षणात आतापर्यंत साचेबद्ध, कप्पेबद्ध मांडणी होती. नव्या लवचिक क्रेडिट पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडी निवडीप्रमाणे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. क्रेडिट जमा करु शकता. कमावु शकता. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला कला, समाजशास्त्रचे क्रेडिट कमावता येतील. आज हे गरजेचे झाले आहे. 

अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला अर्थकारण, समाजकारण, मानसशास्त्र कळणे गरजेचे आहे. भाषेवर प्रभुत्व असायला हवे. एक तासाचे लेक्चर नेहमीच रटाळवाणे असते. त्याऐवजी विद्यार्थी टॉपिकनुसार स्वत:च शिकतील. ग्रंथालयाचा उपयोग करतील. बॅंक, मॉल्स्, प्रयोगशाळा, कार्यालयात जाऊन अनुभव घेतील. 

विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यमापनदेखील होईल. परीक्षेचे निकष बदलतील. केवळ पाठांतर, छापील अभ्यासक्रम, ठरलेली ठोकेबाज उत्तरे यावर गुणांकन अवलंबुन न राहता, मुलांना किती समजले त्याची ग्रहणक्षमता किती वाढली, त्याने शिकवलेले किती उपयोगात आणले, हे विविध प्रकल्प, चर्चासत्र, संभाषण, तोंडी परिक्षेद्वारे तपासता येईल, मात्र हे बदल फक्त कागदावरच रहायला नकोत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. असे मत डॉ. पांढरीपांडे यांनी नोंदविले. 

Edited By Pratap Awachar 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com