

Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर: युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत पोचला आहे. गॅस पुरवठा विस्कळित होण्याच्या भीतीने शहरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. गॅस एजन्सींसमोर लांबच लांब रांगा आहेत. संधीचा फायदा घेत सिलिंडरचा काळाबाजारही जोरात सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीतही शहरातील एक मोठा वर्ग अगदी निर्धास्त आहे, तो म्हणजे ज्यांच्या घरी ‘पीएनजी’ (पाइप्ड नॅचरल गॅस) जोडणी पोचलेला.