esakal | उदगीरमधील वंजारवाडीच्या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, पाचशे पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

bird flu

तालुका पशुधन विकास कार्यालयाअंतर्गत जवळपास पाचशे पक्षी मारण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी सतीश केंद्रे यांनी दिली आहे.

उदगीरमधील वंजारवाडीच्या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, पाचशे पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरू

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : वंजारवाडी (ता.उदगीर) येथील तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या गावच्या एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुका पशुधन विकास कार्यालयाअंतर्गत जवळपास पाचशे पक्षी मारण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी सतीश केंद्रे यांनी दिली आहे.


वंजारवाडी येथील पंचावन्न कोंबड्या मुक्त झाल्याची माहिती प्रशासनाला मिळतात पशुधन प्रशासनाने तेथे तात्काळ भेट देऊन प्रयोगशाळेकडे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी आदेश काढून  या गावच्या एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या परिसरातीर वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असून खाजगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जीवंत व मृत कुकुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षी खाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावी पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

या अनुषंगाने पशुसंवर्धन सहआयुक्त  डॉ. एम. एस बोरूळे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. केंद्रे, आपल्या ताफ्यासह वंजारवाडीत दाखल झाले असून संध्याकाळी पक्षी नष्ट करण्याची मोहिम सुरू करणार आहेत. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने केलेल्या सर्वेत जवळपास या भागात पाचशे पक्षी असल्याचे आढळून आले आहेत. त्या भागातील नागरिक व पशुपालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.

Edited - Ganesh Pitekar