Nanded Photo
Nanded Photo

Video : निष्ठावंत आण्णा भाऊ साठेंना कम्युनिष्टांनीच असे खेचले मागे 

नांदेड : पूर्वी कम्युनिष्ट म्हटले की, त्यास वर्षाला कम्युनिष्ट असल्याचा नियमित फॉर्म भरावा लागत असे. एक चच्चे कम्युनिष्ठ म्हणून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी सातत्याने हा  कम्युनिष्ठ असल्याचा फॉर्म भरून खऱ्या अर्थाने निष्ठावंत कम्युनिष्ठ असल्याचे दाखवून दिले होते. मात्र काही कम्युनिष्ठांनीच त्याना पुढे जाऊ दिले नाही. एका सच्च्या कम्युनिष्ठाला कम्युनिष्ठांकडूनच मागे खेचण्याचे काम केले गेल्याची आठवण ज्येष्ठ कॉम्रेड नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी करुन दिली.

मातंग समाजाचे योगदान
पीपल्स महाविद्यालयातील नरहर कुरुंदकर अध्यासन केंद्रात गुरुवारी (ता.१२) लेखक सोमनाथ कदम लिखित ‘आंबेडकर चळवळीतील मातंग समाजाचे योगदान’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मंचावर अध्यक्ष एच. पी. कांबळे, रेखा ठाकूर, किशोर जाधव, लेखक सोमनाथ कदम यांची उपस्थिती होती. श्री. कांगो म्हणाले की,आण्णा भाऊ साठे यांनी कम्युनिष्ठ म्हणून निष्ठेनी अखंडपणे कार्य केले. परंतु, कम्युनिष्ठांनी आण्णा भाऊ यांना कधीच मोठे केले नसल्याची खंत व्यक्त करून अण्णा भाऊ साठे यांना पुढे मोठे करण्यात मातंग समाजाचे योगदान कामी आले, असेही ते म्हणाले. कुठलाही महापुरुष कोणत्या जातीधर्मात जन्माला यावा, हे कुणाच्याही हातात नाही. त्यांना जातीच्या बंधनात अडकवू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

मातंग समाजात एकसंघता नाही-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनी कितीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी, ‘फॅसिझम’ संस्कृतीचा उदय झाल्याने सध्याच्या स्थितीत लेखक, विचारवंतांची गळचेपी होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राजकीय व्यक्तीच्या विरोधात बोलणे, मत व्यक्त करणे गुन्हा ठरत असल्याचे ते म्हणाले. या वेळी रेखा ठाकूर म्हणाल्या की, पेशवाईनंतर राजकारणाची सर्व सूत्रे ब्राह्मणांच्या हाती राहावी, असे अनेकांना वाटत होते. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी आपापल्या परीने त्यास विरोध केला. बाबासाहेबांच्या विचारांना शह देण्यासाठी कॉँग्रेसमधीलच काही ब्राह्ममवाद्यांनी ‘आरएसएस’ची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, राजकीय अशा अनेक अंगांनी कार्य केले. मातंग समाजालादेखील त्यांनी सोबत जोडून घेतले होते. परंतु, मातंग समाजात एकसंघता आली नाही.

बाबासाहेबांच्या चळवळीत नगन्य योगदान-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय अशा दोन्ही ठिकणी सर्व धर्मियांसाठी महान कार्य केले. सर्वांना सोबत घेऊन जाण्यामध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांना मातंग समाजाला सुद्धा सोबत घेतले होते. परंतु त्यांच्या चळवळीत मातंग समाजाचे योगदान अगदी नगण्य दिसून येते. भविष्यात आंबेडकरवादी नेत्यांनी ज्ञानाच्या कक्षा रुंदावून जे विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. एच. पी. कांबळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रमिता वंगलवार यांनी सूत्रसंचालन केले, तर बालाजी थोटवे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com