कोरोनाच्या रुग्ण संख्या वाढली ब्रेक, लातूर जिल्ह्यात प्रशासनाचे प्रयत्न अन् नागरिकांची सावधगिरी

20coronavirus_105_0
20coronavirus_105_0

लातूर : जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भात सप्टेंबर हा महिना सर्वाधिक धोकादायक ठरला होता. त्यामुळे आक्टोबरमध्ये कोरोनाचा आकडा मोठा राहील, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण, दहा दिवसांची आकडेवारी पाहिली तर वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकांची सावधगिरीचा परिणाम आता दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आणखी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.


जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक नऊ हजार १८८ रुग्ण आढळून आले होते. रोज तीनशे चारशे रुग्ण समोर येत होते. मराठवाड्यात लातूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या महिन्यात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेऊन टेस्टचे प्रमाणही वाढवले होते. याचा परिणाम रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती.

हायरिस्क असलेल्या रुग्णांना बाजूला घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचारही करण्यात येत होते. एकीकडे सप्टेंबर हा महिना धोकादायक ठरत असताना दुसरीकडे रुग्णांना बाहेर काढून उपचारही केले जात होते. ऑक्टोबरमध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती राहील असे वाटत होते. पण, आक्टोबर महिन्याचे पहिल्या दहा दिवसाची आकडेवारी पाहिली तर ती सप्टेंबरपेक्षा दिलासादायक ठरत आहे.

या महिन्यात एक तारीख सोडली तर इतर एकाही दिवशी दोनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले नाहीत. शंभर ते दोनशेच्या आतमध्येच रुग्णांची संख्या राहिली आहे. या पुढेही ही संख्या कमी होण्यासाठी नागरीकांनी आणखी काळजी घेण्याची गरज आहे. शासनाने सांगितलेल्या उपाय योजनाची स्वतःहून नागरीकांनी अंमलबजावणी केली तर कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे.


जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात टेस्ट झाल्या होत्या. यातून हायरिस्कचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. चैन तोडण्यात यश आले. त्याचा परिणाम आक्टोबरमध्ये दिसून येत आहे. काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. लोकही जागरूक झाले आहेत. रुग्णांची संख्या कमी होणे म्हणजे आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत हे दिसत आहे.
- डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक.

तारीख सप्टेंबरमधील रुग्ण संख्या ऑक्टोबरमधील रुग्ण संख्या
३१५ २१५
२७४ १७३
४१४ १८८
४२८ १०१
३३६ १९१
२४७ १७४
३४६ १४३
५१५ १४७
३४७ १०२
१० २९५ ९३


एकूण-------३५१७---------------१५२७


रुग्णांचे आकडे बोलतात
एप्रिल १६
मे ११९
जून २१४
जुलै १८५१
ऑगस्ट ५९११
सप्टेंबर ९१८८
आक्टोबर (आजपर्यंत)--१५२७


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com