esakal | सावधान ! आजार काढू नका अंगावर, उशिरा दाखल झाल्याने कोरोना बळींची संख्या सर्वाधिक  
sakal

बोलून बातमी शोधा

corona young.jpg

उमरगा तालूक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्येची वाटचाल दोन हजाराकडे गेली आहे. अजूनही लोक कोरोनाची लक्षणे असून देखील आजार अंगावर काढीत आहेत. उमरगा तालुक्यात आतापर्यंत ५१ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यूत समावेश असल्याचे समोर आले आहे. तर आतापर्यंत तालुक्यात एक हजार ६१५ जण कोरोनामूक्त झाले आहे.  येणाऱ्या एक महिन्यात सतर्कता महत्वाची ठरणार आहे.  

सावधान ! आजार काढू नका अंगावर, उशिरा दाखल झाल्याने कोरोना बळींची संख्या सर्वाधिक  

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. पंधरा दिवसाच्या कालावधीत संसर्गाचा धोका कमी असल्याचे जाणवत असले तरी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे. दरम्यान बुधवारी (ता.सात) दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एक हजार ९०९ पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. त्यातील एक हजार ६१५ कोरोनामूक्त झाल्याची संख्या समाधानकारक असली तरी ५१ जणांचा मृत्यू झाले आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उशिरा दाखल झाल्याने २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक
उमरगा तालुक्यात गेल्या सहा महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालूका प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या साडेतीन महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला आणि आता त्याची संख्या दोन हजाराच्या दिशेने जात आहे. सर्वप्रथम शहरात संसर्ग वाढत होता आता ग्रामीणमध्ये वाढत आहे. सद्यस्थितीत शहरात ८६८ तर ग्रामीण मध्ये एक हजार ४१ संख्या झाली आहे. मृत्युदर हा २. ७ इतका असून ५१ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे. यावरून कोरोनाचा धोका हा कमी झालेला नाही. कोरोना मृत्यूंचा विचार करता रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याने २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अजूनही लोक कोरोनाची लक्षणे साध्या आजाराची समजून आजार अंगावर काढत आहेत. यामुळेच सध्या राबविल्या जात असलेल्या  'माझे कुटूंब माझी जबाबदारी' मोहिमेत घरोघरी सर्वेक्षण करताना प्रशासनाला कोरोना रुग्ण व श्वसन संस्थेशी संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एक हजार ६१५ झाले कोरोनामूक्त
कोरोनाचा संसर्ग अनेकांसाठी जीवघेणा ठरत असला तरी एक हजार ६१५ जणांनी मोठ्या धैर्याने उपचाराला सामोरे जात कोरोनावर मात केली आहे. सध्या २५८ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. कोविड रूग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करणाऱ्यांची संख्या ६५ टक्के आहे तर जवळपास ३५ टक्के लोक होम आयसोलेशनमध्ये राहून कोरोनावर मात करत आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


" प्रशासनाने जनजागृती, विविध उपाययोजना करुन कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. अधिकाधिक संशयित रुग्णांना चाचण्या करुन घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे . शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सीमीटरचा वापर, मास्कचा वापर व  स्वच्छतेबाबत सतर्कता असावी. येणाऱ्या महिन्यामध्ये नवरात्र उत्सव, दसरा व दिवाळी सारखे साजरे होणारे सर्व उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता घरी राहूनच साजरे करणे महत्वाचे ठरेल. 
- संजय पवार, तहसीलदार 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image