जालन्यात सध्या ६९६ कोरोनाग्रस्तांवर उपचार

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना -  जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन हजार २२० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ५४ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा  एक हजार ४५४  इतका झालेला आहे. सध्या ६९६ जणांवर उपचार सुरू आहेत. 

जालना कोविड रूग्णालय येथे उपचार सुरू असणाऱ्या तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये भोकरदन येथील खंडोबा मंदिर परिसरातील ७४ वर्षीय पुरूषाचा शुक्रवारी (ता.३१) मृत्यू झाला. तर गुरूवारी (ता.३०) अंबड तालुक्यातील गोंदी येथील ३९ वर्षीय पुरूषाचा, परतूर तालुक्यातील सिंगोना येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ४७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल दोन हजार २२० कोरोनाबाधित रूग्ण आतापर्यंत झाले आहेत. 

दरम्यान, शुक्रवारी ५४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील नऊ, जालना शहरातील प्रशांतीनगर येथील पाच, भोकरदना तालुक्यातील केदारखेडा येथील चार, शहरातील गोपीकिसन नगर, ग्रीन पार्क, व प्रितीसुधानगर येथील प्रत्येकी तीन, गांधीचमन व साईनगर येथील प्रत्येकी दोन, निलकंठनगर, समर्थनगर, जेईएस कॉलनी, कचेरी रोड, प्रियदर्शनी कॉलनी, कोळेश्वर गल्ली, ख्रिश्चन कॉलनी, यशवंत नगर, दर्गावेस, कादराबाद, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, बदनापूर, बुटखेडा व राधागड येथील प्रत्येकी एक व चांदई एक्को, जळगांव सपकाळ, पिरगैबवाडी व शहागड येथील प्रत्येकी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल एक हजार ४५४ जणांनी कोरोनावर उपचाराअंती मात केली आहेत. तर सध्या ६९६ जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यातील ५२६ संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ५२६ जणांना शुक्रवारी (ता.३१) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ६४,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १३, वन प्रशिक्षण केंद्र येथील वसतिगृह येथे ५२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे १४, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन येथील वसतिगृह येथे पाच, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ५८, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४६, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे ५१, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे २३, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे दहा, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे सात, केजीबीव्ही येथे १८, मंठा येथील केजीबीव्ही येथे २३, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १५, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे दोन, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३९,घनसावंगी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ६७, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे पाच, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे पाच, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १७, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे २४, आयटीआय कॉलेज येथे एक, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे एक, टेभूर्णीं येथील सेठ ईबीके विद्यालय येथे पाच, राजमाता जिजाऊ इंग्रजी शाळा येथे आठ जणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

  • जालना कोरोना मीटर
  • एकूण बाधित : २२२०
  • एकूण बरे झालेले : १४५४
  • उपचार सुरू असलेले : ६९६
  • आतापर्यंत मृत्यू : ७०

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com