संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालन्यात आठ दिवसांमध्ये २७४ कोरोनाबाधित 

जालना - कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग दिवसेंदिवस अधिक वाढू लागला आहे. मागील आठ दिवसांमध्ये तब्बल २७४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर जून महिन्यात तब्बल ४२८ कोरोनाबाधित रुग्ण वाढून आले होते. यात सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे जालना शहराचा कोरोना विळखा कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेला दहा दिवसांचा लॉकडाउन शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे. 

एप्रिल ते मे या दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची ही १२६ होती; मात्र जून महिन्यात यात तब्बल ४२८ तर जुलै महिन्यातील मागील आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात २७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ५०४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. तर ३४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे सध्या २६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २९ जणांना इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. 

सद्यःस्थितीमध्ये जालना शहराला कोरोनाचा वेढा पडला आहे. केवळ जालना शहरात एप्रिल ते ता. ८ जुलैपर्यंत ५६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३०९ जणांवर उपचार करून कोरोनामुक्त करण्यात आले आहे. तर २६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या इतर ठिकाणी रेफर केलेल्या व जालना येथे उपचार सुरू असलेल्या बाधितांपैकी २३० कोरोनाबाधित रुग्ण हे जालना शहरातील आहेत. त्यामुळे लागू करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या कडकडीत लॉकडाउनमुळे कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यास मदत झाली तरच शहरातील कोरोनाचा वाढता आलेखावर अंकुश ठेवता येणार आहे. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टरांकडून करण्यात येणाऱ्या उपचारामुळे जिल्ह्यातील ५०४ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीमध्ये मंठा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, मंठा तालुक्यात २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. हे रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर परतूर शहरही कोरोनामुक्त आहे. 

मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे; परंतु हे कोरोनाबाधित रुग्णांच्या अतिसंपर्कात आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत. अनेक केसेसमध्ये एकाच कुटुंबातील दहा ते पंधराजण कोरोनाबाधित झाले आहेत. अद्याप तरी समूह संसर्गाचा धोका दिसत नाही. 
- डॉ. मधुकर राठोड, 
जिल्हा शल्यचिकित्सक, जालना. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com