Corona Breaking : बलात्कार प्रकरणातला आरोपीच कोरोना पॉझिटिव्ह, पीडीत महिलेसह या ठाण्यातील २५ पोलिसांचे घेतले स्वॅब  

 पांडुरंग उगले
Wednesday, 15 July 2020

बलात्काराचा आरोप असलेला जदीदजवळा (ता. माजलगाव) येथील एका आरोपीचा तपासणी अहवाल बुधवारी (ता.१५) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदरील आरोपी हा पाच दिवस ग्रामीण पोलीस ठाण्यात कोठडीत असल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे. दुपारपर्यंत आरोपीच्या संपर्कातील पिडीत महिलेसह २५ पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

माजलगाव (जि. बीड) : बलात्काराचा आरोप असलेला जदीदजवळा (ता. माजलगाव) येथील एका आरोपीचा तपासणी अहवाल बुधवारी (ता.१५) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदरील आरोपी हा पाच दिवस ग्रामीण पोलीस ठाण्यात कोठडीत असल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे. दुपारपर्यंत आरोपीच्या संपर्कातील पिडीत महिलेसह २५ पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी (ता. १५) आलेल्या तपासणी अहवालात जिल्ह्यात एकूण १९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात माजलगाव तालुक्यातील जदीदजवळा येथील बलात्काराच्या आरोपातील एक आरोपीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

 संबंधित पिडीत महिलेने बुधवारी (ता. आठ) ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. यामुळे सदरील कोरोना पॉझिटिव्ह निघालेला आरोपी हा (ता.९ ते १३ जुलै) दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्यातील कोठडीत राहिल्याने त्याच्या संपर्कात ठाण्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी संपर्कात आले होते. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  
सोमवारी (ता. १३) न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी (ता.१५) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीसदल चांगलेच हादरले आहे. यामुळे बुधवारी दुपारपर्यंत पिडीत महिलेसह ग्रामीण ठाण्यातील २५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वब घेण्यात आले असून अहवाल येईपर्यंत अलगीकरणात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive in rape case swab taken by 25 policemen including victim woman