esakal | ब्रेकिंग : उदगीरला हादरा...सकाळी पाॅझिटिव्ह आलेल्या महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल कोरोनाबाधित एका ६८ वर्षीय महिलेचा शनिवारी (ता.२५) दुपारी मृत्यू झाला. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून महिलेचे वास्तव्य असलेल्या तीन किलोमीटर त्रिज्या क्षेत्रात परिसर सील करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग : उदगीरला हादरा...सकाळी पाॅझिटिव्ह आलेल्या महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लातूर : उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल कोरोनाबाधित एका ६८ वर्षीय महिलेचा शनिवारी (ता.२५) दुपारी मृत्यू झाला. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून महिलेचे वास्तव्य असलेल्या तीन किलोमीटर त्रिज्या क्षेत्रात परिसर सील करण्यात येणार आहे. सकाळीच या महिलेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महिलेच्या मृत्यूनंतर या महिलेला कोरोनाची लागण झालीच कशी आणि ही महिला कोणाकोणाच्या संपर्कात आली, याची सखोल चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. उदगीरमधील चौबारा रोड परिसरातील एक ६८ वर्षीय महिला गुरूवारी (ता. २३) उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिला मधुमेह व दम्याचा त्रास होता. कोरोनाची लक्षणे दिसून येताच डॉक्टरांनी तिच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. शनिवारी सकाळी या नमुन्यांचा अहवाल आला. त्यात ही महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

आठ परप्रांतीयानंतर जिल्ह्यात या महिलेच्या निमित्ताने पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. यातच या महिलेची प्रकृती गंभीर झाली. तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. दुपारी चार वाजता या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुरवातीला ही महिला गुजरात येथून आल्याची चर्चा घडून आली. मात्र, गुजरात येथून आलेली ३५ वर्षीय महिला उदगीरमध्येच संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये होती.

तिचा व मृत महिलेचा काहीच संबंध नसल्याचे पुढे आल्यानंतर प्रशासन चांगलेच कोड्यात पडले आहे. यामुळे महिलेला कोरोनाची बाधा कशी झाली, ती कोणत्या कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आली आणि कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होण्यापूर्वी ती कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, याचा कसून शोध प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान महिलेचे वास्तव्य असलेला तीन किलोमीटर त्रिज्या क्षेत्रातील परिसर सील करण्यासह अन्य उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

खरे सांगा, स्वार्थ पाहू नका
काही लोक त्यांचा प्रवास तसेच संपर्काची खऱी माहिती प्रशासनाला देत नाहीत. वेळीच खरे सांगितल्यास उपाययोजना तसेच उपचाराची संधी मिळते. त्याचा संबंधित व्यक्ती व समाजाला काहीच त्रास होत नाही. मात्र, काही लोक स्वार्थापोटी आणि भीतीपोटी स्वतःच्या संपर्क तसेच प्रवासाची माहिती लपवत आहेत. त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागत आहे. यामुळे लोकांनी अशा परिस्थितीत स्वार्थ न पहाता व भीती न बाळगता प्रशासनाला खऱी माहिती सांगण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

loading image