जालन्यात ८२ जण ग्रस्त; ७२ कोरोनामुक्त 

उमेश वाघमारे 
Monday, 20 July 2020

रविवारी जिल्ह्यात, शहरात तब्बल ८२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या तब्बल एक हजार ३९९ झाली आहे. तर आतापर्यंत ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जालना - शहरात कोरोना मीटर सुरूच आहे. रविवारी (ता. १९) तब्बल ८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरात ता. पाच जुलैपासून लॉकडाउन लागू करण्यात आला होता. हा लॉकडाउन सोमवारी (ता.२०) शिथिल करण्यात येणार आहे. मात्र, या काळातही कोरोनाचे मीटर सुरू राहिले आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

रविवारी जिल्ह्यात, शहरात तब्बल ८२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या तब्बल एक हजार ३९९ झाली आहे. तर आतापर्यंत ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता.२०) शहरातील मार्केट खुले झाल्यानंतर कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अपेक्षित आहे; अन्यथा कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

उपचाराअंती ७२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रविवारी कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात जालना शहरातील ६७ जणांचा समावेश आहे. यात संभाजीनगर येथील १३, ढोरपुरा येथील आठ, गवळीगल्ली येथील सहा, चौधरीनगर येथील पाच, कन्हैय्यानगर येथील चार, मंमादेवी परिसातील तीन, तुळजाभवानीनगर, एसटी कॉलनी, खवा मार्केट येथील प्रत्येकी दोन, तर कादराबाद, गणेशगिरी, पाणीवेस, क्रांतीनगर, खिश्चन कॉलनी, सदर बाजार, पोस्ट ऑफिस, नेहरू रोड, गुडलागल्ली, नळगल्ली, आदित्यनगर, भाग्यनगर, कसबा, शाकुंतलनगर, व्यंकटेशनगर, रामनगर, माणिकनगर, तट्टुपुरा, पेन्शपुरा, माळीपुरा, माऊलीनगर, शास्त्री मोहल्ला येथे प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. तर टेंभुर्णी (ता. जाफराबाद) येथील पाचजण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आतापर्यंत ६०८ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ६०८ जणांना रविवारी संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ९७, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३०, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १३०, गुरुगणेश भवन येथे १२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ८२, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४३, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ४२, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे नऊ, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे ६७, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे ४६, अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १८, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे एक, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे एक, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीनजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of Jalna

Tags
टॉपिकस