वेल डन डाॅक्टर! नऊ दिवसांत ७७ रुग्ण बरे 

महेश गायकवाड
Wednesday, 10 June 2020

कोविड हॉस्पिटलमध्ये अहोरात्र कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमातून नऊ दिवसात ७७ रुग्ण बरे केले. हे विशेष. 

जालना -  जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या बरे होण्याच प्रमाणही कायम आहे. मंगळवारी( ता.नऊ) तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोविड हॉस्पिटलमध्ये अहोरात्र कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमातून नऊ दिवसात ७७ रुग्ण बरे केले. हे विशेष. 

जिल्ह्यात आतापर्यंत २१९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १२५ रुग्ण बरे झाले आहे. यात ता.१ मे पासून आतापर्यंत तब्बल ७७ रुग्ण बरे झाले आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आरोग्य यंत्रणेवरील कोरोनाचा भार कमी होण्यास मदत होत आहे. दरम्यान मंगळवारी बरे झालेल्या तीन रुग्णांमध्ये मठ पिंपळगाव (ता.अंबड) येथील ४० वर्षीय महिला, धावडा (ता.भोकरदन) येथील २९ वर्षीय पुरुष व जालना तालुक्यातील गोलावाडी गणेश नगर येथील चाळीस वर्षीय महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा :   कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

सध्या शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये ८४ रुग्णावर उपचार सुरू आहे. तर पाच रुग्ण औरंगाबाद येथील रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात एकही अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला नाही. 

जिल्ह्यात ५०८ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण ५०८ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २०, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ३५, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २४, पोलिस प्रशिक्षण केंद्रात २०८, परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात १०, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात १७ व पंचगंगा मंगल कार्यालयात ३३ व्यक्तींचे अलगीकरणात आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात १५, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ४२ व अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेलमध्ये २४, मंठ्याच्या डॉ. मॉडेल स्कुलमध्ये ४१ तर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात१५, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात २ आणि परतुर येथील मॉडेल स्कुलमध्ये २२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna