जालन्यात कोरोनामुक्तीचा आकडा चारशेपार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोनाबाधितांपैकी २२ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले, त्यांना शनिवारी (ता.चार) रुग्णालयातून सुटीही मिळाली. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि समस्त यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्याने कोरोनामुक्तीचा आकडा चारशेपार केला आहे. 

जालना -  जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोनाबाधितांपैकी २२ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले, त्यांना शनिवारी (ता.चार) रुग्णालयातून सुटीही मिळाली. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि समस्त यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्याने कोरोनामुक्तीचा आकडा चारशेपार केला आहे. 

दरम्यान, शनिवारी (ता.चार) ३३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६८५ झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. जिल्ह्यात सध्या २३६ जणांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

जालना शहरातील भाग्योदयनगर, कृष्णकुंज सोसायटीमधील प्रत्येकी एक,  राज्य राखीव पोलिस दलामधील सहा जवान, मंगळबाजारमधील पाच, आनंदनगरातील एक, कन्हैयानगरातील दोन, गुडला गल्लीतील पाच, अंबड रोडवरील एक  अशा एकूण २२ रुग्णास  डिस्चार्ज  देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ४०१ झाला आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

जिल्ह्यात शनिवारी (ता.चार) पुन्हा कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यात शहरातील संभाजीनगर येथील दोन, पोलिस गल्ली, अग्रसेननगर, बारवाल गल्ली, दुर्गामाता रोड, कांचनपूल कॉलेज रोड, आरपी रोड, मूर्तिवेस, सत्यनारायणनगर स्टेशन रोड, कट्टुपुरा, गवळी मोहल्ला, क्रांतीनगर, विद्युत कॉलनी, जाफराबाद येथील जारवार गल्ली, टेंभुर्णी येथील बुलडाणा अर्बन येथे प्रत्येक एकजण कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर शहरातील मोदीखाना, दानाबाजार, लक्कडकोट येथे प्रत्येक तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शहरातील भरवान गल्ली, नाथबाबा गल्ली, वसुंधरा कॉलनी, टेंभुर्णी येथील सुतारगल्ली येथे प्रत्येक दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ता. पाच जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १५ जुलैपर्यंत वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला आहे. त्यामुळे किमान या लॉकडाउनदरम्यान तरी नागरिकांनी घरात राहिल्यास कोरोनाचा हा विळखा कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. 

जिल्ह्यात ४४० जणांचे संस्थात्मक अलगीकरण 

जिल्ह्यात शनिवारी (ता.चार) ४४० जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षक केंद्र येथे चार, मोतीबाग परिसरातील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १३, संत रामदास वसतिगृह येथे ३६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १७, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ५६, मुलींचे शासकीय वसतिगृह येथे ३२, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे २०, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५५, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे नऊ, केजीबीव्ही येथे तीन, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे तीन, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ६०, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १५, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दोन, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ३५, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ११, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १७, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १४, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे २२ व हिदुस्थान मंगल कार्यालय येथे १६ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna