जालन्यात कोरोनाच्या विळख्यातून ६४ जण सुटले

उमेश वाघमारे 
Sunday, 19 July 2020

जिल्ह्यात शनिवारी (ता.१८) नव्याने ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८२० जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, यातील ६४ जणांनी शनिवारी कोरोनावर मात केली आहे.

जालना - शहरातील कोरोनाबाधित रुग्णामध्ये दिवसेंदिवस भर पडतच आहे, सोबतच मृत्यूचा दरही दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी (ता.१७) रात्री तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी (ता.१८) नव्याने ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८२० जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, यातील ६४ जणांनी शनिवारी कोरोनावर मात केली आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल एक हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. यात शनिवारी ५९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहरातील तीन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ५२ जणांचे बळी घेतले आहे. यात शहरातील जेपीसी कॉलनी येथील ८० वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी रात्री मृ्त्यू झाला आहे. त्यांना ता. आठ जुलै रोजी जालना कोविड रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. भीमनगर येथील ५२ वर्षीय पुरुषाला ता. १२ जुलै रोजी जालना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. तर शहरातील गोपालपुरा येथील ६५ वर्षीय पुरुषाला ता. १२ जुलै रोजी जालना कोविड रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचाही शुक्रवारी (ता.१७) रात्री मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, आतापर्यंत एकूण एक हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यापैकी ८२० जण कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या जालना येथे ४०६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर ३७ कोरोनाबाधितांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे.

हेही वाचा :  कोरोनाने पित्याला गिळले, रुग्णालयाने मातेला छळले 

उपचारानंतर शनिवारी ६४ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये जालना शहरातील ५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात शहरातील गांधीनगर येथील १३, रामनगर येथील सहा, साईनगर, कादराबाद येथे प्रत्येकी चार, तुळजाभवानीनगर, पाणीवेस, जिजामाता कॉलनी, मोदीखाना येथील प्रत्येकी दोन, प्रियदर्शिनी कॉलनी, गोपीकिशननगर, कालीकुर्ती, समर्थनगर, कन्हैयानगर, लक्कडकोट, सतकरनगर, अमित हॉटेल परिसर, हकीम मोहल्ला, चार्वापुरा, दुखीनगर, संभाजीनगर, कुंभारगल्ली, नूतन वसाहत, कॉलेज रोड येथील प्रत्येक एकजण कोरोनामुक्त झाला आहे. जाफराबाद शहरातील बाजार गल्ली. मंठा येथील घारे कॉलनी, भोकरदन, अंबड, चिंचखेड (ता.अंबड) येथील प्रत्येकी एक, दहिपुरी (ता.अंबड) येथील तीन, कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी) येथील दोन, घनसावंगी येथील चारजण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात ५३७ जण संस्थात्मक अलगीकरणात

जिल्ह्यातील ५३७ जणांना शनिवारी (ता.१८) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे सात, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३०, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १२०, गुरुगणेश भुवन येथे १२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ७१, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे २९, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ४३, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे नऊ, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे ८८, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे ५५, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे आठ, अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १८, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे एक, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ११, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे पाच जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna