जालन्यात कोरोनातून ३३ जण बरे 

उमेश वाघमारे 
Thursday, 30 July 2020

जिल्ह्यात बुधवारी (ता. २९) ४१ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ९८ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जालना - जिल्ह्यात बुधवारी (ता. २९) ४१ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ९८ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३३ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ३६० कोरोनामुक्त झाले आहेत, तर ६७३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील ५० वर्षीय पुरुषाचा बुधवारी (ता.२९) कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ता. २४ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात कोरोना मीटर सुरूच असून, बुधवारी (ता.२९) नव्याने ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, बुधवारी (ता. २९) ३३ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शहरातील कसबा येथील नऊ, अंबड तालुक्यातील गोंदी येथील आठ, जालना शहरातील रामनगर व संभाजीनगर येथील प्रत्येकी दोनजण, पाणीवेस, भाग्यनगर, पांगारकरनगर, जिजामाता कॉलनी, लोधी मोहल्ला, जालना शहर, पुष्पकनगर, सिंधी भवन, गणपती गल्ली, अंबड, यावलगाव, राममूर्ती येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल एक हजार ३६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात ५८० जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ५८० जण बुधवारपर्यंत (ता. २९) संस्‍थात्‍मक अलगीकरणात आहेत. शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे सात, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १३, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ४५, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे १७, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे १५, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५५, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे १७, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ४५, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे ९६, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे ६६, गुरुगणेश भुवन येथे १८, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे १३, केजीबीव्ही येथे दोन, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे १३, केजीबीव्ही येथे ११, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४१, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४७, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे पाच, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दोन, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १३, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १३, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे एक, आयटीआय कॉलेज येथे आठ, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे पाचजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna