esakal | दीड हजार जणांचा कोरोनावर विजय 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

शहरासह जिल्ह्यातील तब्बल दीड हजार कोरोनाग्रस्तांनी उपचारानंतर कोरोनावर विजय प्राप्त केली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १) ४९ कोरोनाग्रसस्तांची भर पडली, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

दीड हजार जणांचा कोरोनावर विजय 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना - शहरासह जिल्ह्यातील तब्बल दीड हजार कोरोनाग्रस्तांनी उपचारानंतर कोरोनावर विजय प्राप्त केली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १) ४९ कोरोनाग्रसस्तांची भर पडली, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण दोन हजार २६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ७२ जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, सध्या ६९१ जणांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

शहरासह जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. परिणामी आजघडीला जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २६९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जालना कोविड रुग्णालय येथे उपचार सुरू असलेल्या यावलपिंप्री (ता. घनसावंगी) येथील ७० वर्षीय पुरुषाचा शनिवारी (ता. एक), तर अंबड शहरातील ७० वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी (ता. ३१) कोरोनाने मृत्यू झाला. तर ४९ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होत आहेत. शनिवारी (ता. एक) ५२ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये शहरातील कन्हैयानगर येथील सहा, नॅशनलनगर व बुटखेडा येथील प्रत्येकी चार, आरपी रोड, रामनगर पोलिस कॉलनी व चंदनझिरा येथील प्रत्येकी तीन, व्यंकटेशनगर, भीमनगर, दर्गावेस व शहरातील इतर भागांतील प्रत्येकी दोन, प्रयागनगर, नाथबाबा गल्ली, गोपिकिशनगर, बुऱ्हाणनगर, जयभवानीनगर, कबाडी गल्ली, मस्तगड, नया बाजार, लक्कडकोट, नळगल्ली, सामान्य रुग्णालय परिसर, टाऊन हॉल, भाग्यनगर, मोदीखाना, बालाजीनगर, कचेरी रोड, प्रशांतीनगर, गुडलागल्ली, कोष्टी गल्ली, अंबड, वरूड बुद्रुक येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल एक हजार ५०६ कोरोनाग्रस्त उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यातील ४९६ संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ४९६ जणांना शनिवारी (ता. एक) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे दोन, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ५९, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन येथील वसतिगृह येथे दहा, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे आठ, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ३९, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ६३, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे सहा, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे १४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे ५८, गुरुगणेश भवन येथे पाच, संत रामदास हॉस्टेल येथे दहा, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे २३, मंठा येथील केजीबीव्ही येथे १५, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ५१, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ६२, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे पाच, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पाच, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १७, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे पाच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे एक, आयटीआय कॉलेज येथे आठ, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे चारजणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)