जालना जिल्ह्यात १५५५ जण कोरोनामुक्त

उमेश वाघमारे 
Monday, 3 August 2020

जिल्ह्यात ९७ नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना - जिल्ह्यात रविवारी (ता. दोन) एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. ९७ नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले असून, ७९७ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्यास तयार नाही. त्यात मागील काही दिवसांपासून जालना शहरानंतर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणार भर ही चिंता वाढविणारी आहे.

जालना कोविड रुग्णालय येथे रविवारी (ता. दोन) अंबड शहरातील सुरंगेनगर येथील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे एकूण ७३ जणांचा बळी गेला आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

कोरोनाबाधितांमध्ये रविवारी ९७ रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये जालना शहरातील समर्थनगर येथील तीन, डबलजीन व प्रीतिसुधानगर येथील प्रत्येकी दोन, संभाजीनगर, जांगडेनगर, दुर्गामाता रोड, आरपी रोड, भाग्यनगर, सोनलनगर, इसार गार्डन, मधुबन कॉलनी, सकलेचानगर, रामनगर, धोका मिल, हमालपुरा, रामनगर पोलिस कॉलनी येथील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर परतूर येथील बालाजी गल्ली येथील चार, मोंढा येथील दोन, खतीब मोहल्ला, जिजाऊनगर, म्हसला, नवा मोंढा येथील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित आढळून आला. अंबड शहरातील नऊ, सुरंगेनगर येथील एक, अंबड तालुक्यातील साडेसावंगी येथील दोन, गोंदी येथील एकजण कोरोनाग्रस्त आढळून आला. जालना तालुक्यातील पाचनवडगाव येथे एक व कोठी येथे दोनजण, बदनापूर येथील गणेशनगर व गोधी मोहल्ला येथील प्रत्येकी एक, भोकरदन शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील चार, प्रसाद गल्ली येथील एक, परदेशी गल्ली येथील चार, जाफराबाद रोड परिसरातील पाच, घनसावंगी तालुक्यातील भातखेडा येथील एक, देऊळगावराजा येथील दोन व शनिवारपेठ व सिव्हिल कॉलनी येथील प्रत्येकी एकजण असे ६६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर रात्री उशिरा ३१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, जिल्ह्यात ४९ जण उपचाराअंति कोरोनामुक्त झाले आहेत. यात शहरातील कन्हैयानगर येथील नऊ, संभाजीनगर, गोपीकिशननगर व कालीकुर्ती येथील प्रत्येकी तीन, जवाहरबाग, ख्रिस्ती कॅम्प, संभाजीनगर व सारथी कॉलनी येथील प्रत्येकी दोन, गोपाळपुरा, रहेमानगंज, जालना शहर, प्रयागनगर, मंगळबाजार, माणिकनगर, अग्रसेननगर, खरपुडी, पोलिस गल्ली, लक्ष्मीनारायणपुरा, आझाद मैदान, पोस्ट ऑफिस, जमुनानगर, केदारखेडा, पारध बुद्रुक, गोकुळ येथील प्रत्येकी एकजण हडपसावरगाव (ता. जालना) येथील तीन, अकोला येथील चार अशा एकूण ४९ जणांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ७९७ जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यातील ४३१ जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यात ४३१ जणांना रविवारी (ता. दोन) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ७२, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे २५, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे आठ, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे ४४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे १२, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ११, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ५८, संत रामदास हॉस्टेल येथे १७, पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे चार, गुरुगणेश भवन येथे सहा, परतूर येथील केजीबीव्ही येथे १७, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे १४, केजीबीव्ही येथे १५, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४०, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३१, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सात, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १९, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह १७, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १०, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे चारजणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna