जालन्यात आतापर्यंत एक हजार ५९७ जण झाले बरे  

उमेश वाघमारे 
Wednesday, 5 August 2020

जिल्ह्यात आज घडीला एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता दोन हजार ४९५ झाला आहे. त्यापैकी एक हजार ५९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना - जिल्ह्यात कोरोना मीटर सुरू आहे. मंगळवारी (ता.चार) ११८ कोरोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी जालना जिल्ह्याने कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात गेली आहे. जिल्ह्यात आज घडीला एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता दोन हजार ४९५ झाला आहे. त्यापैकी एक हजार ५९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ८२३ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. तर दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत ७५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. 

जालना शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. जालना शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात प्रत्येकी दिवसाला कोरोनाबाधित रूग्णात भर पडत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे होणारी मृत्यू ही थांबण्यास तयार नाहीत. सोमवारी (ता.तीन) शहरातील इतवारा परिसरातील ३६ वर्षीय महिलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर मंगळवारी (ता.चार) अंबड तालुक्यातील शहागड येथील ४५ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ७५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

कोरोनाच्या रूग्ण संख्येत भर पडत असून मंगळवारी ११८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील नुतन वसाहत व समर्थ नगर येथील प्रत्येकी दोन, शंकरनगर, दुखीनगर, म्हाडा कॉलनी, साईनगर, आनंदवाडी, अजिंक्यनगर, मंमादेवी, अंबर हॉटेल परिसर येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित आढळून आला आहे. तसेच भोकरदन शहरातील जयभवानीनगर व तालुक्यातील पारध येथील प्रत्येकी एक, अंबड तालुक्यातील शहागड, चंदनापूरी, साडेगाव येथील प्रत्येकी एक, देऊळगावराजा येथील दोन, धमधम (ता. जिंतुर) येथील एक, परतूर शहरातील एक असे एकूण २७ जण तर अॅंटीजेन तपासणीव्दारे ४१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर रात्री उशिरा पुन्हा ५० जणांचे आहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या ही दोन हजार ४९५ झाली आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान मंगळवारी (ता.चार) ३० जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील आठ, जालना शहरातील मोदीखाना येथील तीन, गांधी चौक व शहरातील इतर भागातील प्रत्येकी दोन, अंबड शहरातील चार, भांबेरी येथील दोन, जालना शहरातील लक्कडकोट, भवानीनगर, संभाजीनगर, राज्य राखील पोलिस बल, गांधीचमन, मारवाड गल्ली, कादराबाद, सुखशांतीनगर, गुरू गोविंदसिंगनगर, धोपटेश्वर (ता.बदनापुर) येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एक हजार ५९७ जणांनी कोरोनावर विजय प्राप्त केला असून ८२३ जणांवर उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna