जालना जिल्ह्यात ७७ जणांची कोरोनावर मात 

उमेश वाघमारे 
Friday, 7 August 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजार ६२३ झाली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही आता एक हजार ६९८ झाली आहे. यामध्ये गुरुवारी (ता.सहा) ७७ जणांना कोरोनावर मात केली आहे.

जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजार ६२३ झाली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही आता एक हजार ६९८ झाली आहे. यामध्ये गुरुवारी (ता.सहा) ७७ जणांना कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ८४१ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्यू सुरू आहे. गुरुवारी (ता.सहा) शहरातील मस्तगड येथील ७० वर्षीय पुरुषाचा तर तालुक्यातील नागेवाडी येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला. तर इतर सहाजणांचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात नव्याने ४० कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार ६२३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान गुरुवारी (ता.सहा) ७७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शहरातील रामनगर येथील नऊजण, यशवंतनगर, बुऱ्हाणनगर व गोपीकिसननगर येथील प्रत्येकी पाचजण, भाग्यनगर व शहागड (ता.अंबड) येथील प्रत्येकी चारजण, सामान्य रुग्णालय निवासस्थान, बिहारीलालनगर व अग्रसेननगर येथील प्रत्येकी तीनजण, शिवाजीनगर, पाणीवेस, कादराबाद, सिंधी बाजार, पुष्पकनगर, जालना शहर व रोहिलागड (ता.अंबड) येथील प्रत्येकी दोनजण कोरोनामुक्त झाले. तर जालना शहरातील भोला चौक, जेईएस महाविद्यालय परिसर, दर्गावेस, इंदिरानगर, राज्य राखीव पोलिस बलाचे जवान, आशीर्वादनगर, सदर बाजार, अंबर हॉटेल परिसर, ग्रीनपार्क, प्रयागनगर, पिवळा बंगला, नेहरू रोड, अयोध्यानगर, कन्हैयानगर, गुडला गल्ली, संभाजीनगर, प्रीतिसुधानगर, सुखशांतीनगर, सिंदखेडराजा, मायानगर (औरंगाबाद शहर), मजरेवाडी, शिवना (ता. सिल्लोड) येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जिल्ह्यात तब्बल एक हजार ६९८ जणांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे. सध्या ८४१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna