जालन्यात चोवीसशेपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त 

उमेश वाघमारे 
Wednesday, 19 August 2020

जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार ८५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी तब्बल दोन हजार ४०६ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे

जालना - जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार ८५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी तब्बल दोन हजार ४०६ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर १०८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून एक हजार ३३६ कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. मंगळवारी (ता.१८) ५७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये भोकरदन शहरातील देशमुख गल्ली येथील सहाजण, भोकरदन तालुक्यातील पारध, मोहाडी, जालना शहरातील बालाजीनगर येथील प्रत्येकी चारजण, जालना शहरातील पोलिस क्वार्टर, सुलतानपूर, परतूर शहर, दैठणा व अंबड शहर येथील प्रत्येकी तीनजण, जालना शहरातील कादराबाद येथील दोनजण, जालना शहरातील मिशन हॉस्पिटल परिसर, बिहारीलालनगर, जानकीनगर, म्हाडा कॉलनी, राजपूतवाडी, भाग्योदयनगर, संजयनगर, शास्त्री मोहल्ला, प्रीतिसुधानगर, लक्ष्मीनारायणपुरा, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. तीन, बदनापूर, मंठा शहरातील जानकीनगर, तांदूळवाडी, परतूर शहरातील साठेनगर, मंठा शहर, केळीगव्हाण, भोगाव, खेडगाव, सुखापुरी, पिंपळगाव, वालसावंगी येथील प्रत्येकी एकजण असे एकूण ५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, रात्री उशिरा ५७ स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ८५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे जालना शहरातील आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

 जिल्ह्यात ५५९ जणांना मंगळवारी (ता. १८) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ५१ जण, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४७ जण, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे २४ जण, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १७ जण, राज्य राखीव पोलिस बल गट क्वार्टर सी ब्लॉक येथे २२ जण, राज्य राखीव पोलिस बल गट क्वार्टर डी ब्लॉक येथे १४ जण, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे चारजण, केजीबीव्ही येथे ४३ जण, मंठा येथील केजीबीव्ही येथे २३ जण, मॉडेल स्कूल येथे १५ जण, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३५ जण, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १७ जण, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३० जण, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४६ जण, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे २८ जण, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ७३ जण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४६ जण, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे २२, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे दोन जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna