जालन्यात तीन हजारांपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त

उमेश वाघमारे 
Thursday, 27 August 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त रुग्णाची संख्या ही वाढत आहे. परिणामी बुधवारी (ता. २६) जिल्ह्याने तीन हजारांचा कोरोनामुक्तीचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल चार हजार २८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त रुग्णाची संख्या ही वाढत आहे. परिणामी बुधवारी (ता. २६) जिल्ह्याने तीन हजारांचा कोरोनामुक्तीचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल चार हजार २८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, १२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ११६ जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यू सुरूच आहेत. यात जालना शहरातील ६७ वर्षीय पुरुषाचा व घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधितांची बुधवारी भर पडली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील तब्बल १८ जण, खासगी रुग्णालयातील पाचजण, शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील चारजण, घनसावंगी व वरूड येथील प्रत्येकी तीनजण, माहोरा येथील दोनजण, भोकरदन, परतूर, डोणगाव, अंबड, नेर येथील प्रत्येकी एकजण अशा एकूण ४० जणांचा कोरोना अहवाल आरटीपीसीआर तपासणीद्वारे पॉझिटिव्ह आला. तर अँटीजेन तपासणीद्वारे २६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार २८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, बुधवारी ६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये लालवाडी येथील १२ जण, फत्तेपूर येथील नऊजण, मंठा येथील आठजण, नूतन वसाहत येथील पाचजण, एसआरपीएफ व बावणेपांगरी येथील प्रत्येकी चारजण, जालना शहरातील समर्थनगर व भोकरदन शहरातील देशमुख गल्ली येथील प्रत्येकी तीनजण, जालना शहरातील गांधी चमन, वाल्मीकनगर, शाकुंतलनगर, गणपती गल्ली, सराफनगर, लक्ष्मीकांतनगर, बेथल, दुसरबीड, मांडवा (ता. बदनापूर), अंबड शहरातील राजपूत मोहल्ला, खामगाव, शेलगाव येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल तीन हजार ४४ जणांनी उपचाराअंती कोरोनावर मात केली आहे. सध्या एक हजार ११६ जणांवर उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna