जालन्यात कोरोनाबाधितांची साखळी कायमच 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची साखळी कायमच आहे. गुरुवारी (ता.२८) तीस नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला असून, त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ११५ पोचली आहे.

जालना -  जिल्ह्यात कोरोनाबाधितांची साखळी कायमच आहे. गुरुवारी (ता.२८) तीस नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला असून, त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ११५ पोचली आहे.  यापैकी आतापर्यंत २५ रुग्ण बरे झाले असून, सध्या रुग्णालयात ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात गुरुवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जालना शहरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात अलगीकरणात आलेल्या शहरातील नूतन वसाहत, नूतनवाडी व ढोरपुरा येथील प्रत्येकी तीन अशा नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर सामनगाव (ता.जालना) येथील एक व पोलिस प्रशिक्षण केंद्रात अलगीकरण केलेल्या राज्य राखीव दलातील एका जवानाचाही अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथे मुंबईवरून परतलेल्या सहा, कातखेडा येथील पाच व अंबड शहरातील शारदानगर येथील रहिवासी असलेल्या पाच अशा एकूण १६ व्यक्तींचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला असून, या सर्वांचे अंबड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये अलगीकरण करण्यात आले होते.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

बदनापूर येथील ३३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परतूर येथील एका आणि मंठा तालुक्यातील कानडी येथील एका व्यक्तीचा अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. 

 • जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण 
 • ६ एप्रिल : दुखीनगरमधील ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिला बाधित 
 • २१ एप्रिल : शिरोडा (ता. परतूर) येथील महिला 
 • १ मे : पारध (ता. भोकरदन) येथील सतरावर्षीय युवती 
 • २ मे : परतूर तालुक्यात मुंबईहून आलेला युवक. 
 • २ मे : मालेगावच्या बंदोबस्तावरून परतलेले चार जवान. 
 • १० मे : कानडगाव येथे (ता. अंबड) मुंबईवरून आलेले दोघे. 
 • १० मे : इंदेवाडी परिसरातील गर्भवती. 
 • ११ मे : जिल्हा रुग्णालयातील एक परिचारिका 
 • ११ मे : राज्य राखीव दलातील एक जवान 
 • १२ मे : राज्य राखीव दलातील एक जवान 
 • १३ मे : मुंबईहून रामनगरकडे परतणारा युवक, राज्य राखीव दलातील एक जवान व परतूर येथील एक व्यक्ती. 
 • १४ मे : कोविड हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर. 
 • १५ मे : खासगी हॉस्पिटलचा डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी व पेवा (ता. मंठा) येथे मुंबईहून आलेली महिला व राज्य राखीव दलातील चार जवान. 
 • १७ मे : खासगी हॉस्पिटलमधील दोन कर्मचारी, घनसावंगीतील पीरगॅबवाडी येथील सहा व रांजणी येथील एक, अंबड येथील कानडगाव येथील एक. 
 • १८ मे : नूतनवाडी येथील अकरावर्षीय मुलगा. 
 • १९ मे : जालना शहरातील खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी व अंबड तालुक्यातील शिरनेर येथे मुंबईवरून परतलेला एक व्यक्ती. 
 • २० मे : मुंबईवरून अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगावात परतलेल्या एका कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह 
 • २२ मे : जुना जालना भागातील हॉस्पिटलमधील चार, तर नवीन जालना परिसरातील हॉस्पिटलमधील एक कर्मचारी, पेवा (ता. मंठा) येथील एक, राज्य राखीव दलातील एक जवान व टेंभुर्णी (ता. जाफराबाद) येथे मुंबईवरून परतलेली एक महिला. 
 • २३ मे : जुना जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील एक कर्मचारी व मुंबईवरून हिवरा काबली (ता. जाफराबाद) येथे आलेला एक व्यक्ती. 
 • २४ मे : अंबड शहरातील एकाच कुटुंबातील ४ पॉझिटिव्ह. यात चार वर्षांच्या मुलाचा समावेश. नवीन जालना भागातील खासगी हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी, पुष्पकनगरमधील एक व निरखेड येथील एक. 
 • २५ मे : जुना जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी व एका वर्षाचा मुलगा, नूतनवाडी येथील २, अंबड तालुक्यातील शिरनेर येथील १, मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा आणि कानडी येथील प्रत्येकी एक. 
 • २६ मे : मुंबईवरून मठपिंपळगाव (ता. अंबड) येथे परतलेल्या कुटुंबातील अकरावर्षीय मुलगी व दहावर्षीय मुलगा, मुंबईवरून वखारी वडगाव (ता. जालना) येथे परतलेल्या दोन महिला व हिवरा काबली (ता. जाफराबाद) येथील एका सात वर्षांचा मुलगा व महिला. 
 • २७ मे : नुतनवाडीतील महिला, चांधई एक्को येथील ३६ वर्षीय पुरुष व १२ वर्षीय मुलगी, खापरदेव हिवरा येथील  युवक तसेच पीरगैबवाडीतील महिला, खासगी रुग्णालयातील तीन कर्मचारी.
 • २८ मे :  जालना शहरातील नूतन वसाहत, नूतनवाडी व ढोरपुरा येथील प्रत्येकी तीन,  सामनगाव (ता.जालना) येथील एक, राज्य राखीव दलातील एक जवान,  अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथे मुंबईवरून परतलेले सहाजण, काटखेडा येथील पाच व अंबड शहरातील शारदानगर येथील पाच,   बदनापूर येथील एक व्यक्ती,   परतूर येथील एक आणि मंठा तालुक्यातील कानडी येथील एकजण.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna