जालन्यात कोरोनाने गाठले आठजण

महेश गायकवाड
Sunday, 14 June 2020

जालना जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधित रूग्णांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी (ता.13) चौदा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर  रविवारी (ता.14) पुन्हा कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आठ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांच्या संख्या 277 झाली आहे.

जालना -   जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधित रूग्णांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी (ता.13) चौदा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर  रविवारी (ता.14) पुन्हा कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आठ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांच्या संख्या 277 झाली आहे.

 जिल्ह्यात बाधित आढळून येत असलेल्या कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यात कोविड हॉस्‍पिटलमधील डॉक्टरांना यश येत आहे. मात्र, रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे रविवारी नव्याने आठ रूग्णांची भर पडली असून यामध्ये जालना तालुक्यातील रामनगर येथील एक, शहरातील नानक निवासमधील तीन 3, अलंकार टॉकीज परिसरातील एक 1,  रूख्मिणीनगरमधील 1 व अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगावातील  दोन व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

दरम्यान, सोनक पिंपळगावात यापूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.  

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा  277 झाला आहे. त्यापैकी आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 150 रूग्ण कोरोनावर मात करून घरी  परतले आहे. सध्या रूग्णालयात 119 रूग्णांवर उपचार सुरू असून यातील सहा रूग्णांना औरंगाबादमधील हॉस्पीटलमध्ये संदर्भीत करण्यात आले आहे. 

 

  • जालना कोरोना अपडेट
  • एकुण बाधित - 277
  • बरे झाले - 150 
  • उपचार सुरू - 119
  • मृत्यू -आठ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna