कोरोनाच्या विळख्यात नवे २८ जालनेकर 

महेश गायकवाड
Saturday, 20 June 2020

जालन्यातील रुग्णांमध्ये शहरातील खडकपुरा येथील नऊ, आनंदनगर तीन, लक्कडकोट चार, समर्थनगर दोन, शहरातील रामनगर परिसरातील पाच, कन्हैयानगर, आरपी रोड, क्रांतीनगर व मंगळ बाजार भागातील प्रत्येकी एक आणि जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील एकाचा समावेश आहे.

जालना - शहरातील विविध आठ भागांत शुक्रवारी (ता. १९) तब्बल २८ व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक अशा २९ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहराची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील चाररुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे निम्म्याहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे डॉक्टरांचा आत्मविश्‍वास वाढत असला, तरी जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढत आहे. गुरुवारी (ता. १८) तब्बल २९ रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आल्यानंतर शुक्रवारी तेवढ्याच रुग्णांची भर पडली.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

या रुग्णांमध्ये शहरातील खडकपुरा येथील नऊ, आनंदनगरातील तीन, लक्कडकोट भागातील चार, समर्थनगरातील दोन, शहरातील रामनगर परिसरातील पाच, कन्हैयानगर, आरपी रोड, क्रांतीनगर व मंगळ बाजार भागातील प्रत्येकी एक आणि जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील एकाचा समावेश आहे. तर एक रुग्ण जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील चार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले असून, त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या चार व्यक्तींमध्ये शहरातील कादराबाद भागातील दोन, पोलिस मुख्यालयातील एक व सरस्वती मंदिर परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे.  शुक्रवारी वाढलेल्या रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३५३ झाली असून, त्यापैकी २२५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात ११८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात २६४ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण २६४ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील संत रामदास वसतिगृहात ११, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १८, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २३, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ९, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ८५, जालना शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ३४, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात २, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ९ व पंचकृष्ण मंगल कार्यालयात एक व्यक्ती अलगीकरणात आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात २० व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ८, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २ व अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ८, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४ व भोकरदन येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १८ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna