अबब, जालन्यात ८३ नवे बाधित 

उमेश वाघमारे 
Sunday, 12 July 2020

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पडणारी भर थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. शनिवारी (ता. ११) तब्बल ८३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९१ वर जाऊन पोचली आहे.

जालना - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पडणारी भर थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. शनिवारी (ता. ११) तब्बल ८३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९१ वर जाऊन पोचली आहे. दरम्यान, शनिवारी ३३ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले, त्यांनी सुटी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात सध्या ३२९ कोरोनाबाधितांवर जालना येथे उपचार सुरू असून, अन्य २९ कोरोनाबाधितांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ जणांचा या कोरोनाने बळी घेतला आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

शहरातील गांधीनगर येथे १४ रुग्ण आढळले. याशिवाय रामनगर येथे सात, कन्हैयानगर येथे सहा, जालना शहरात तीन, संभाजीनगर, सुवर्णकारनगर, नळगल्ली, जिजामाता कॉलनी, मोदीखाना, तुळजाभवानीनगर येथे प्रत्येकी दोन, यशवंतनगर, कबाडीपुरा, माऊलीनगर, पोस्ट ऑफिस रोड, जे.ई.एस. कॉलेज रोड, भाग्यनगर, चिंचखेड येथे प्रत्येकी एक असे एकूण ४९ जणांचे कोरोना अहवाल शनिवारी दुपारपर्यंत पॉझिटिव्ह प्राप्त झाले, तर सायंकाळी ३४ कोरोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शनिवारी एकूण ८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. 

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये जालना शहरातील मोदीखाना येथील चार, भोकरदन शहरातील तीन, दुर्गामाता रोड, लक्कडकोट, जिजामाता कॉलनी, कादराबाद येथील प्रत्येकी दोन, कोठारीनगर, अग्रसेननगर, संभाजीनगर, पुष्पक कॉलनी, बरवारगल्ली, भगवान हनुमान रोड, कट्टुपुरा, विद्युत कॉलनी, गवळी मोहल्ला, व्यंकटेश दालमिल, नेहरू रोड, नाथबाबा, दानाबाजार, देऊळगावराजा, भोकरदन येथील कैलास मंगल कार्यालय परिसर, भोकरदन येथील रोकडा हनुमान परिसर, मसनापुरा (ता. भोकरदन), वालसा वडाळा (ता. भोकरदन) येथील प्रत्येकी एक अशा एकूण ३३ जणांचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण ५९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात ६१२ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यात शनिवारी ६१२ जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे तीन, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ५६, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह येथे तीन, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ५७, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे तीन, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ६५, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ९८, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे ११९, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे १४, मंठा येथील केजीबीव्ही येथे १९, अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १२, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३३, घनसवांगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १३, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे आठ, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १२, शासकीय मुलांचे वसतिगृह येते सात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, जाफराबाद येथील जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे २२, आय.टी.आय. कॉलेज येथे १४, जे.बी.के. विद्यालय येथे आठजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna