जालना शहरात ३८ नवीन बाधित

उमेश वाघमारे 
Tuesday, 21 July 2020

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवारी (ता. २०) ४९ जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यात जालन्यात ३८, तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये ११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जालना - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवारी (ता. २०) ४९ जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यात जालन्यात ३८, तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये ११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या तब्बल एक हजार ४४८ झाली आहे. दरम्यान, सोमवारी दोनजण कोरोनातून बरे झाले, आतापर्यंत एकूण ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५०० जणांवर उपचार सुरू आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जालना शहरात कोरोनाचा प्रसार सुरूच आहे. सोमवारी जिल्ह्यात आढळलेल्या ४९ कोरोनाग्रस्तांपैकी ३८ जण हे जालना शहरातील आहेत. त्यातील १४ कोरोनाग्रस्त हे शहरातील संभाजीनगर भागातील आहेत. तर लक्कडकोट, रामनगर येथील प्रत्येकी तीन रुख्मिणी गार्डन येथील दोन, दुखीनगर, आरपी रोड, ग्रीनपार्क, पुष्पकनगर, भाग्यनगर, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिव्हिल निवासस्थान गांधीनगर, पाणीवेस, दर्गावेस, महालक्ष्मी अपार्टमेंट, भारतमाता मंदिर, समर्थनगर, नीलकंठनगर, गुडलागल्ली, गणपती गल्ली येथील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित आढळला आहे. तर अंबड तालुक्यातील शिवना, साष्टपिंपळगाव, अंबड शहर येथील प्रत्येकी एक, बदनापूर शहर, बदनापूर तालुक्यातील अकोला, अकोला निकळक येथील प्रत्येकी एक, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को, केदारखेडा येथील प्रत्येकी एक, जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील एक, जालना तालुक्यातील सेवली येथील एक, तर नांदेड जिल्ह्यात लोहा येथील एकजण कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही तब्बल एक हजार ४४८ झाली आहे. तर जालना येथे ४६१ व इतर ठिकाणी रेफर केलेल्या ३९ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत कोरोनाने ५४ जणांचा बळी घेतला आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जालना शहरातील सार्थकनगर येथील दोनजण सोमवारी (ता.२०) कोरोनामुक्त झाल्याने त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत ८९४ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. 

जिल्ह्यात ६७८ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ६७८ जणांना सोमवारी (ता. २०) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०२, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३७, वनप्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १६४, गुरुगणेश भुवन येथे १२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ८२, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५६, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ४३, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे २९, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे २८, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे ४१, अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १८, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे एक, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे एक, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ४२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १६, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna