जालना जिल्ह्यात १३१ जण कोरोनाबाधित

उमेश वाघमारे 
Sunday, 26 July 2020

जिल्ह्यात कोरोना मीटर सुरूच असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी (ता. २५) जिल्ह्यात १३१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर १०३ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना -  जिल्ह्यात कोरोना मीटर सुरूच असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी (ता. २५) जिल्ह्यात १३१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर १०३ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (ता. २४) एक ४७ वर्षीय पुरुषाचा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृत्यू झाला होता. त्या व्यक्तींचा मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह होता, हे स्पष्ट झाले आहे. 

कोविड रुग्णालय येथे उपचार सुरू असलेले १०३ जण शनिवारी कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शहरातील लक्कडकोटमधील १५, संभाजीनगर येथील १२, मोदीखाना येथील दहा, महसूल कॉलनी येथील आठ, रामनगर, मंगळबाजार येथील प्रत्येकी सात, माणिकनगर येथील सहा, दत्तनगर, गांधीनगर, कादराबाद येथील प्रत्येकी चार, लोधी मोहल्ला, कन्हैयानगर येथील प्रत्येकी तीन, नाथबाबा गल्ली, कसबा येथील प्रत्येकी दोन, आरपी रोड, जिल्हा परिषदेच्या पाठीमागील परिसर, नळगल्ली, साईनगर, भीमनगर, सावरगाव हडप, पाणीवेस, चौधरीनगर, कुंभार गल्ली, चांदई एक्को, सिद्धिविनायकनगर, रेणुका कॉलनी, अण्णा भाऊ साठेनगर, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक तीन, पोलास गल्ली, राहुलनगरातील प्रत्येकी एक अशा एकूण १०३ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास तयार नाही. शनिवारी जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजार ८२७ वर जाऊन ठेपली. यात १३१ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. यात जालना शहर दहा, नूतन वसाहत, आशीर्वादनगर, नळगल्ली येथील प्रत्येकी दोन, बालाजीनगर, रामनगर, कचेरी रोड, संभाजीनगर, सकलेचानगर, मंगळबाजार, ग्रामीण रुग्णालय निवासस्थान परिसरातील, पॉवरलूम, जेईएस कॉलेज परिसर, अलंकार रोड, पोस्ट ऑफिस रोड, जेठमलनगर, मनीषानगर, लक्कडकोट, कबाडी मोहल्ला, संजयनगर, रहेमानगंज, राज्य राखीव पोलिस बल गट तीनमधील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर पळसखेडा (जि. बुलडाणा) येथील दोन, आष्टी (ता. परतूर) येथील दोन, अंबड तालुक्यातील गोंदी येथील सात, शहागड (ता. अंबड), राणीउंचेगाव (ता. घनसावंगी), जाफराबाद शहर, वाढेगाव, अंबड, ठाकूरनगर, यावलपिंपरी येथील प्रत्येकी एक, तर गोकुळ (ता. भोकरदन) येथील दोन अशा ५५ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहेत. तर अँटीजेन तपासणीद्वारे १३ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, शनिवारी (ता.२५) रात्री उशिरा ६३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे शनिवारी (२५) एकूण कोरोनाबाधित १३१ रुग्णांची वाढ झाली. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

आतापर्यंत एक हजार ५५ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले, सध्या जालना येथे ५७३ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ४० जणांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत ५९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

एकाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह 

शहरातील जेईएस परिसरातील रहिवासी असलेला ४७ वर्षीय पुरुष रुग्णास उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना ता. २३ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा शुक्रवारी (ता. २४) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर शनिवारी (ता. २५) त्यांच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. 

जिल्ह्यात ८९२ जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ८९२ जणांना शनिवारी (ता. २५) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०२, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे सात, वनप्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १८१, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६४, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ५६, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ६१, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे २४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर डी ब्लॉक येथे ६४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर सी ब्लॉक येथे ११४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर ए ब्लॉक येथे सहा, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे पाच, केजीबीव्ही येथे दोन, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे १५, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १२, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४०, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २७, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे सात, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ६०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २३, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १२, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे सातजणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna