esakal | जालन्यात कोरोनाचे १२५ नवे बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

कोरोनामुळे तीनजणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. २७) दिली. यासोबतच १२५ नवीन बाधित, तर ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालन्यात कोरोनाचे १२५ नवे बाधित 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना - कोरोनामुळे तीनजणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. २७) दिली. यासोबतच १२५ नवीन बाधित, तर ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.  आतापर्यंत एक हजार ९८२ कोरोनाग्रस्त आढळून आले, तर एक हजार २६२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या ६५७ जणांवर उपचार सुरू आहेत. 

जालना कोविड रुग्णालय येथे उपचार सुरू असणाऱ्या तीनजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील पाणीवेस परिसरातील ७५ वर्षीय महिला, अंबड शहरातील ६९ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे रविवारी (ता. २६) रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मंठा तालुक्यातील वाढेगाव येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा सोमवारी (ता. २७) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत ६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात सोमवारी १२५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील प्रशांतनगर, भीमनगर, विठ्ठल मंदिर, मिशन हॉस्पिटल येथील प्रत्येकी तीन, मराठा बिल्डिंग, रामनगर, चरवाईपुरा येथील प्रत्येकी दोन, गुरुकृपा कॉलनी, यशवंतनगर, समर्थनगर, विद्यानगर, चंदनझिरा, आझाद मैदान येथील म्हाडा कॉलनी, गीतांजली कॉलनी, शास्त्री मोहल्ला, लक्कडकोट, गणपती गल्ली, हनुमानघाट, सिव्हिल हॉस्पिटल, आनंदवाडी, राममंदिर येथील प्रत्येकी एक, जालना शहरातील इतर भागांमधील ३४, भोकरदन तालुक्यातील बुटखेडा येथील सहा, केदारखेडा येथील चार, मेहकर येथील कॉटन मार्केट येथील तीन, खामगाव येथील दोन, हिस्वन खुर्द (ता. जालना) येथील एक, अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव, शहागड येथील प्रत्येकी एक, देवमूर्ती येथील एक, गारखेडा (जि. औरंगाबाद) येथील एक, पळसखेडा येथील एक, सिंदखेडराजा येथील एकजण, तर अँटीजेन तपासणीद्वारे सहाजण कोरोनाबाधितांसह अन्य ३२ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. परिणामी आतापर्यंत एकूण एक हजार ९८२ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

डॉक्टरांसह आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळे अनेकजण कोरोनातून मुक्त होत आहेत. यात सोमवारी ४० जण बरे झाले आहेत. यामध्ये शहरातील कादराबाद येथील १४, आशीर्वादनगर येथील चार, मस्तगड, संभाजीनगर येथील प्रत्येकी तीन, मोदीखाना व इतर भागांतील प्रत्येकी दोन, भाग्यनगर, पाणीवेस, दर्गावेस, रुख्मिणी गार्डन, बदनापूर, पुंडलिकनगर, व्यंकटेशनगर, कसबा, मंगळबाजार, कचेरी रोड, भोकरदन तालुक्यातील धावडा, अन्वा येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल एक हजार २६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी सध्या जालना येथे ५८४ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ४१ जणांना उपचारासाठी इतर ठिकणी रेफर करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील ६७४ संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ६७४ जणांना सोमवारपर्यंत संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे सहा, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे २२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ३७, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ५२, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे २०, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५६, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ५४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ८३, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे ८९, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे १३, गुरुगणेश भवन येथे १३, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे ५, केजीबीव्ही येथे २, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे २२, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल येथे ४५, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ६९, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २६, घनसवांगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दोन, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे पाच, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे आठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे तीन, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १८, आयटीआय कॉलेज येथील आठ, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे सात, पार्थ सैनिक स्कूल येथील नऊजणांचा समावेश आहे. 


(संपादन : संजय कुलकर्णी)