जालन्यात कोरोनाचे १४८ बाधित

उमेश वाघमारे 
Saturday, 8 August 2020

जिल्ह्यात कोरोना बाधितांची भर सुरूच असून शुक्रवारी (ता.सात) १४८ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडल्याने आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार ७७१ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत.

 जालना- जिल्ह्यात कोरोना बाधितांची भर सुरूच असून शुक्रवारी (ता.सात) १४८ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडल्याने आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार ७७१ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. तर २० जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, आतापर्यंत एक हजार ७१८ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ९६९ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण ८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. यात अँटीजेन टेस्टव्दारे देखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.सात) अँटीजेन टेस्टव्दारे ३२ जण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. रात्री उशिरा ११६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा 

उपचारानंतर २० कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामध्ये जालना शहरातील भवानीनगर येथील पाच, घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील पाच, जालना शहरातील शिवाजीनगर येथील दोन, संजयनगर, मंमादेवी नगर, मुर्तीवेस, उतार गल्ली, तेरापंथी भवन, रेल्वे स्टेशन रोड, शहागड (ता. अंबड), दरेगाव (ता. जालना) येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ७१८ जणांनी उपचाराअंती कोरोनावर मात केली आहे. 

जिल्ह्यात ४८६ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जालना जिल्ह्यात ४८६ जणांना शुक्रवारी (ता.सात) संस्थात्मक अलीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ४०, शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह येथे १५, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे१२, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे ८२, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे ११, केजीबीव्ही येथे ११, मंठा येथील केजीबीव्ही येथे सहा, मॉडेल स्कूल येथे दहा, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ५४, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ६१,अंकुशनगरच्या साखर कारखाना येथे ५४, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १२, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १२, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ३४, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २८, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४०, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे चार जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna