esakal | जालन्यात कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजार
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

जिल्ह्याने मंगळवारी (ता.११) तीन हजार कोरोनबाधितांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १०१ जणांचा बळी गेला आहे.

जालन्यात कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजार

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  जिल्ह्याने मंगळवारी (ता.११) तीन हजार कोरोनबाधितांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १०१ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत एक हजार ८७१ जणांनी उपचाराअंती कोरोनावर मात केली असून, सध्या एक हजार ४२ जणांवर उपचार सुरू आहेत. 

जालना शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर शहराला कोरोना वेढा पडला; मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झालेला नव्हता; परंतु मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जिल्ह्यात प्रतिदिन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. मंगळवारी (ता.११) सकाळी जिल्ह्यात नव्याने ९९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तीन  हजार १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरतील कादराबाद येथील ७४ वर्षीय एका कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. ११) मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने १०१ बळी घेतले आहेत.  दरम्यान, मंगळवारी ६१ जणांनी उपचारअंती कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ८७१ कोरोनाग्रस्तांनी उपचाराअंती कोरोनावर विजय प्राप्त केला आहे.  त्यामुळे सध्या एक हजार ४२ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात  मंगळवारी (ता.११) ६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील साखर कारखान्याचे ३० जण, जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सात कैदी, जालना शहरातील समर्थनगर व गणपती गल्ली येथील  प्रत्येकी चारजण, कादराबाद येथील तीनजण, अंबड चौक व  प्रीतिसुधानगर येथील प्रत्येकी दोन जण, नाथबाबा गल्ली, आयटीआय परिसर, बिहारीलालनगर, धोकमिल, आनंदवाडी,  जेपीसी बँक कॉलनी, परतूर शहर, मेहकर, अंबड तालुक्यातील पाथरवाला  येथील एकजण कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत एक हजार ८७१ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत.

या ठिकाणी आढळले नवीन बाधित 

मंगळवारी (ता. ११) जिल्ह्यात ९९ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलिस गट निवासस्थान येथील १६ जण, शहरातील योगेशनगर येथील सहाजण, पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन) येथे पाचजण, जालना शहरातील माळीपुरा येथे चारजण, शहरातील बजाजनगर, कन्हैयानगर, भाजी मार्केट, सराफा बाजार, शांकुतलनगर येथील प्रत्येकी दोनजण, नाथबाबा गल्ली, अंबड रोड, सिंधी बाजार, लक्ष्मीनारायणपुरा, लक्ष्मीकांतनगर, नूतन वसाहत येथील प्रत्येकी एकजण, अंबड तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथील एक, आष्टी (ता. परतूर) येथील दोनजण, मोहाडी येथील तीनजण, परतूर शहरातील एकजण, म्हसरूळ (ता. जाफराबाद) येथील एक, दरेगाव (ता. जालना) येथे एक, खेडगाव (ता. बदनापूर) येथील दोन, किनगावराजा (जि. बुलडाणा) येथील एक, मेहकर (जि. बुलडाणा) येथील एक, धोपटेश्वर (ता. बदनापूर) येथील एक, बदनापूर शहरातील एक, जाफराबाद शहरातील एक, जाफराबाद तालुक्यातील हरतखेडा व वरखेडा येथील प्रत्येकी एक, भायगाव येथे दोन, असोला जहांगीर (ता. देऊळगावराजा) येथील एक, त्रिंबकनगर (देऊळगावराजा) येथील एक अशा एकूण ६९ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह, तर अँटीजेन तपासणीद्वारे ३० अशा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तीन हजार १४ कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

जिल्ह्यात ७२५ जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जालना जिल्ह्यात ७२५ जणांना जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. ११) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६०, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे सहा, पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे २५५, गुरुगणेश भवन येथे तीन, परतूर येथील  मॉडेल स्कूल येथे १५, केजीबीव्ही येथे २५, मंठा येथील केजीबीव्ही येथे १३, मॉडेल स्कूल येथे २२, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४७, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १८, अंकुशनगर साखर कारखाना येथे ६३, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३८, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३८, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे २९, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ५६, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे चार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १५, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथील १५ जणांना अलीकरणात ठेवण्यात आले आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)