esakal | जालन्यात कोरोनामुळे १९२ जण बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ कमी होण्यास तयार नाही. परिणामी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाटचाल चार हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी तब्बल १९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

जालन्यात कोरोनामुळे १९२ जण बाधित 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ कमी होण्यास तयार नाही. परिणामी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाटचाल चार हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे.

दरम्यान, सोमवारी तब्बल १९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ७९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ६९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत दोन हजार ३४९ जणांनी कोरोनावर विजय प्राप्त केला आहे. आतापर्यंत १०८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून सध्या एक हजार ३३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

शहरासह जिल्ह्यातील ६९ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती सोमवारी (ता.१७) कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील नऊ जण, जालना शहरातील नळगल्ली, सरस्वती कॉलनी, आष्टी, भोगगाव, वरूड व खासगाव येथील प्रत्येकी चारजण, सिरसवाडी, मिशन हॉस्पिटल परिसर, गणेशनगर, मंठा व तीर्थपुरी येथील प्रत्येकी तीन जण, परतूर शहरातील मोंढा व जाफराबाद शहरातील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील राज्य राखीव बल गट, प्रयागनगर, योगेशनगर, आझाद मैदान, कन्हैयानगर, माळीपुरा, शिक्षक कॉलनी, लोधी मोहल्ला, प्रतापनगर, राजपूतवाडी, जिंतूर, भोकरदन, साष्टपिंपळगाव, अंकुशनगर, कानडगाव, लोणगाव व माहोरा येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जिल्ह्यात नव्याने १९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथे सातजण, जालना शहरातील अंबड चौफुली येथे सहाजण, नूतन वसाहत येथे पाचजण, कादराबाद व मुरारीनगर येथे प्रत्येकी तीनजण, नळगल्ली, आर्डा तोलाजी, गुरुपिंप्री, तीर्थपुरी, खडका, घनसावंगी, अंबड शहरातील राजपूत मोहल्ला येथे प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील गोकुळधाम, लक्ष्मीकांतनगर, जालना शहर, सामान्य रुग्णालय निवासस्थान, इन्कम टॅक्स कॉलनी, कादराबाद, कचेरी रोड, अंबर हॉटेल परिसर, श्रीकृष्णनगर, सरस्वती कॉलनी, अक्षयनगर, जिंतूर, देऊळगावराजा, लोणार, मंठा, उस्वद (ता. मंठा) येथील प्रत्येकी एक अशा एकूण ५४ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे २२ असे एकूण ७६ व्यक्तींच्या स्वॅबचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. रात्री उशिरा पुन्हा ११६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

६१४ जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यात ६१४ जणांना सोमवारी (ता.१७) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६१ जण, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४७ जण, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ३३ जण, राज्य राखीव पोलिस बल गट क्वॉर्टर सी ब्लॉक येथे सहाजण, राज्य राखीव पोलिस बल गट क्वॉर्टर डी ब्लॉक येथे ३७ जण, पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ४२ जण, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे २६ जण, केजीबीव्ही येथे ३३ जण, मंठा येथील केजीबीव्ही येथे ११, मॉडेल स्कूल येथे ३५ जण, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २५ जण, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १९ जण, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २६ जण, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४७ जण, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे आठजण, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ८७ जण, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १२ जण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३५ जण, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे २२ जण, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे दोनजणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

loading image